Sun, May 31, 2020 13:56होमपेज › National › चाणक्य कोण? अमित शहा म्हणाले...

चाणक्य कोण? अमित शहा म्हणाले...

Last Updated: Feb 14 2020 3:20PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना अनेकवेळा चाणक्य यांच्याबरोबर केली गेली आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान खरे चाणक्य कोण तुम्ही का शरद पवार? तुम्ही चाणक्यची पदवी शरद पवार यांना दिली आहे का? असा प्रश्न केला होता. त्यावर अमित शहा यांनी दिलेल्या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

वाचा : भीमा कोरेगाव तपासावरून शरद पवारांची नाराजी; म्हणाले...

अमित शहा यांनी म्हटले, की मी चाणक्यनिती खूप वाचली आहे. ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विचाराची उंची मोठी आहे. भगवान कौटिल्य (आचार्य चाणक्य) यांच्याशी होणाऱ्या तुलनेबाबत मी विचारही करू शकत नाही. शरद पवार यांच्याबाबत बोलायचे  झाल्यास  ते देशातील दिग्गज नेते आहेत. त्यांनी अनेक सरकारे स्थापन केली, अनेक सरकारे पाडली.

वाचा : भागवत कथा सांगायला येऊन विवाहितेला पळवून नेलेल्या महाराजाचा खुलासा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढविली. या युतीला १६१ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून वितुष्ट निर्माण झाल्यानंतर भाजपची साथ सोडत शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. यात शरद पवारांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शरद पवार यांनी भीष्म पितामह म्हणून भूमिका निभावली, असे एका भाजप खासदाराने शरद पवारांचे जाहीर कौतुक केले होते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार दिग्गज नेते असल्याचे म्हटले आहे.

वाचा : पुलवामा हल्ला : 'ती' पवित्र माती गोळा करण्यासाठी मराठमोळ्याचा 61 हजार किमी प्रवास