Tue, Jul 14, 2020 12:58होमपेज › National › अनंतनागमध्ये २४ तासात ५ दहशतवादी ठार 

अनंतनागमध्ये २४ तासात ५ दहशतवादी ठार 

Last Updated: Jun 30 2020 12:31PM
श्रीनगर : पुढारी ऑनलाईन 

मागील २४ तासात अनंतनागमध्ये पोलिस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त कारवाईत ५ दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली आहे. 

याआधी अनंतनागच्या बिजबेहाराच्या वाघामा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरुच आहे.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन 

पाकिस्तानने आज सकाळी नौगाम सेक्टर, बारामूला येथे एलओसीनजीक मोर्टार दागले. त्याचबरोबर, गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सेनेनेदेखील प्रत्युत्तरादाखल कारवाई केली.