Fri, Sep 18, 2020 18:58होमपेज › National › बाप रे! ८ वीच्या विद्यार्थ्यावर वर्गशिक्षिकेचं जडलं प्रेम 

बाप रे! ८ वीच्या विद्यार्थ्यावर वर्गशिक्षिकेचं जडलं प्रेम 

Last Updated: Jan 21 2020 6:58PM

संग्रहित छायाचित्रअहमदाबाद : पुढारी ऑनलाईन  

शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर होय. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवतात. ज्ञानाबरोबरचं शाळेत विद्यार्थ्यांना नीतीमूल्ये, संस्कार शिक्षकांकडून मिळतात. परंतु, आता या सर्व गोष्टींना छेद देणारी घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आठवीच्या मुलाबरोबर वर्गशिक्षिकाच पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.  

शाळेतील वर्गशिक्षिकाच आठवीच्या मुलासोबत पळून गेली. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला आहे. गांधीनगर जिल्ह्यातील कालोल पोलिस स्टेशनमध्ये शिक्षिकेविरूध्द तक्रार नोंदवली आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून शिक्षिका आणि मुलगा बेपत्ता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका आणि मुलामधील अफेअर शाळा प्रशासनाला माहीत होते. याप्रकरणी दोघांनाही समज दिली होती. गेल्या वर्षभरात दोघांमध्ये जवळचे नाते निर्माण झाले होते. मुलगा अल्पवयीन आहे. त्यांचे नाते कोणीही मान्य करणार नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे शुक्रवारी दोघेही घर सोडून निघून गेले. 

मुलाचे वडील म्हणतात-

याप्रकरणी कलम ३६३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलाचे वडील म्हणाले-“मी संध्याकाळी सात वाजता घरी पोहोचलो, त्यावेळी मुलगा घरामध्ये नव्हता. मुलगा चार वाजता घराबाहेर पडल्याचे मला माझ्या पत्नीने सांगितले. आम्ही त्याचा शोध घेतला. परंतु, तो कुठेही सापडला नाही. मी शिक्षिकेच्या घरी गेलो, त्याही तिथे नव्हत्या.” 

दोघांनीही आपले मोबाईल नेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध लागू शकलेला नाही, अशी कालोल पोलिसांनी माहिती दिली. 

 "