Sat, May 30, 2020 01:19होमपेज › National › मासिक पाळी संदर्भात एका महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

मासिक पाळी संदर्भात एका महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

Last Updated: Feb 18 2020 6:52PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

इंदुरीकर महाराजांचे स्त्रियांबाबतच्या वक्तव्याचे प्रकरण ताजे असतानाच महिलांच्या मासिक पाळी संदर्भात स्वामी कृष्णा स्वरूप यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. 

मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला पुढचा जन्म श्वान कुळात येईल असे वादग्रस्त वक्तव्य स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी केले आहे. भुज येथील स्वामी नारायण मंदिराचे ते स्वामी आहेत. एवढेच नाही तर मासिक पाळीच्या काळात जी स्त्री स्वयंपाक करते आणि ते अन्न जो पुरुष खातो त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल असेही वक्तव्य कृष्णस्वरुप दासजी यांनी केले आहे. 

काही दिवसापूर्वी इंदुरीकर महाराज यांनी स्त्रियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील संत स्वामी कृष्णा स्वरूप यांनी महिलांनी मासिक पाळीवेळी भोजन तयार केल्यास तिचा पुढील जन्म कुत्रीचा होतो आणि ते भोजन पुरूषाने खाल्ल्यास त्याचा पुढील जन्म बैलाचा होतो असे म्हटले आहे. सोमवारी स्वामी कृष्णा यांनी अनुयायांना संबोधित करताना हे विधान केले. 

स्वामी कृष्णा म्हणाले, मासिकपाळी दरम्यान महिलांनी स्वयंपाक घरापासून दूर राहिले पाहिजे. नाही तर त्यांनी नरकात जायला तयार राहा. भलेही ही गोष्ट कुणाला कटू वाटेल पण हे खरे आहे, असे त्यांनी विधान  केले. 

ते पुढे म्हणाले की, मासिक पाळी आलेल्या महिलांनी तयार केलेले अन्न खाणे टाळा. तुम्ही अशा महिलांच्या हातचे खात असाल, तर त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. कारण शास्त्रात याबद्दल अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्नाच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टींची कल्पना असायला हवी,' असे असे आवाहन त्यांनी पुरुषांना केले. 

स्वामी कृष्णस्वरुप दासजी भूजमधल्या स्वामीनारायण मंदिराचे उपदेशक आहेत.