Mon, Sep 21, 2020 11:49होमपेज › National › राम मंदिराच्या भूमिपूजनातील 'त्या' ९ विटा 

राम मंदिराच्या भूमिपूजनातील 'त्या' ९ विटा 

Last Updated: Aug 05 2020 3:31PM
अयोध्या : पुढारी ऑनलाईन 

प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत आज ( दि. 5 ) ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाले. या भूमिपूजनासाठी  खास 9 विटा वापरण्यात आल्या. भूमिपूजन करणाऱ्या पुजाऱ्यांनी त्या खास 9 विटांचे महत्व भूमिपूजन संपन्न झाल्यानंतर सांगितले. 

पुजारी म्हणाले की 'भूमिपूजनासाठी 9 खास विटा वापरण्यात आल्या आहेत. या विटा 1989 मध्ये जगभरातून रामभक्तांनी पाठवलेल्या 2 लाख 75 हजार विटांमधून निवडण्यात आल्या आहेत. जगभरातीन आलेल्या 100 विटा ज्याच्यावर जय श्रीराम असे कोरले आहे त्या बाजूला काढल्या आहेत.'  यातील एक विट ही चांदीची आहे.  

याचबरोबर जवळपास 2 हजार पेक्षाजास्त धार्मिक स्थळांवरील माती आणि 100 पेक्षा जास्त धार्मिकदृष्ट्या पवित्र मानल्या जाणाऱ्या नद्यांचे पाणी शुद्धीकरण आणि भूमिपूजनाच्या विधींसाठी आज वापरण्यात आले आहे. तसेच भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासंदर्भातील टपाल तिकीटेही प्रकाशित केली. 

राम मंदिराच्या भूमिपूजनाचे विधी पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. त्यात त्यांनी हा सोहळा संपूर्ण भारतवासीयांसाठी एक भावनिक क्षण आहे असे वक्तव्य केले. ते म्हणाले 'प्रत्येक ह्रदय प्रज्वलित झाले आहे. हा संपूर्ण देशासाठी भावनिक क्षण आहे. मोठ्या प्रतिक्षेचा काळ समाप्त झाला. ज्या रामलल्लांनी अनेक वर्षे तंबूत वास्तव्य केले त्यांच्यासाठी आता भव्य मंदिर निर्माण होणार आहे.' 

 "