Wed, Aug 12, 2020 12:53होमपेज › National › विकृतांनी हत्तीणीला दिले फटाक्यानं भरलेलं अननस आणि..

विकृतांनी हत्तीणीला दिले फटाक्यानं भरलेलं अननस आणि..

Last Updated: Jun 03 2020 12:50PM
तिरूअनंतपुरम: पुढारी ऑनलाईन

सध्या सोशल मीडियावर पाण्यात उभारलेल्या एका गर्भवती हत्तीणीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो केरळमधील असून यासंदर्भात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या गर्भवती हत्तीणीला  विकृत लोकांनी फटाक्याने भरलेले अननस खायला दिले. खाताच ते फटाक्याने भरलेले अननस तोंडातच फुटले आणि हत्तीणी गंभीररित्या जखमी झाली. 

ही घटना उत्तर केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात २७ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली. या घटनेची माहिती एका वनअधिकाऱ्याने फेसबुक पेजवर दिली. वन अधिकारी मोहन कृष्णन्न यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती हत्तीणीला अन्नाच्या शोधात जंगलातून जवळच्या एका गावात आली. ती भूकेने व्याकूळ झाल्याने इकडे तिकडे भटकू लागली. मात्र, काही विकृत लोकांनी तिच्या जिवाशी खेळ केला. फटाक्याने भरलेले अननस खायला दिले. तिच्या तोंडात ते अननस फुटल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. तरीसुद्धा तिने कोणाला कोणतेच नुकसान पोहचवले नाही. 

गंभीररित्या जखमी झाल्याने ती काहीच खाऊ शकत नव्हती. आपल्या पोटातील बाळाला वाचवण्यासाठी ती जखमी अवस्थेत वेल्लियार नदीकडे गेली. ती १८-२० दिवसात बाळाला जन्म देणार होती. असह्य होणाऱ्या यातना कमी होण्यासाठी आपले जखमी तोंड पाण्यात बुडवून उभी राहिली. 

तसेच मोहन कृष्णन्न पुढे म्हणाले, हाथिनीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आणखी दोन हत्तींना सोबत नेले. परंतु जखमी हत्तीणीला कोणालाच जवळ येऊन दिले नाही. कित्येक तास प्रयत्न करूनसुद्धा ती बाहेर आली नाही. पाण्यातच तिने उभा राहून अखेरचा श्वास घेतला. 

अंत्यसंस्काराठी हत्तीणीला ट्रकने जंगलात नेण्यात आले. ज्या ठिकाणी ती राहत होती त्याच ठिकाणी तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आली असल्याची माहिती मोहन कृष्णन्न यांनी दिली.