Fri, Sep 18, 2020 23:17होमपेज › National › 'त्या' संपत्ती विकून टाका, एक लाख कोटी मिळतील! कोणी दिला मोदी सरकारला सल्ला?

'त्या' संपत्ती विकून टाका, एक लाख कोटी मिळतील! कोणी दिला मोदी सरकारला सल्ला?

Last Updated: Sep 16 2020 11:47AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोविड -१९ या महामारीमुळे होणारी आर्थिक वाढीसाठी आणि सध्याचा वाढीव खर्चाची पूर्तता करण्यासाठी सरकारने एक लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या शत्रूंची मालमत्ता विक्री करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य निलेश शहा यांनी सुचविले आहे. 

एका मुलाखतीत निलेश शहा यांनी म्हटले की, तुम्ही मालमत्ता विकून कमाई केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढील कोरोना खर्चासाठी पैसे उपलब्ध होतील. तीन वर्षांपूर्वी या शत्रूंच्या मालमत्तेचे मूल्य अंदाजे एक लाख कोटी रुपये होते. अतिक्रमण हटविणे आणि अशा मालमत्तांची विक्री करण्याचा हा उत्तम काळ आहे. शहा म्हणाले की, अशाप्रकारच्या ९४०४ मालमत्ता जी १९६५ पासून सरकारने नियुक्त केलेल्या कस्टोडियनमध्ये ठेवल्या आहेत.  

वाचा : मुंबईत दररोज ५०० किलो ड्रग्ज फस्त!

भारत आणि पाकिस्तानने १९६५ च्या युद्धानंतर शत्रूंची मालमत्ता संपादन करण्यासाठी कायदे केले होते. १९७१ मध्येच पाकिस्तानने ही संपूर्ण मालमत्ता विकली आहे. परंतु या प्रकरणात भारत ४९ वर्ष मागे कसा काय आहे?. असा प्रश्न ही यावेळी शहा यांनी उपस्थित केला आहे. 

शत्रूंची मालमत्ता काय आहे?

शत्रू मालमत्ता कायदा १968 च्या कलम- 8 ए च्या पोट-कलम १ नुसार, शत्रूंच्या मालमत्तेचा अर्थ असा आहे की, विभाजनाच्या वेळी भारत सोडून गेलेल्या लोकांच्या मालकीची मालमत्ता होय. फाळणीनंतर पाकिस्तान आणि चीनमधील अनेक नागरिक भारतातून निधून गेले आहेत. सध्या भारतात पाकिस्तानी नागरिकांच्या अशा ९२८० आणि चीनची १२६ शत्रूंची मालमत्ता आहेत.  

वाचा :नाशिक कांदा निर्यातबंदीने जिल्ह्यात उद्रेक

केंद्र सरकारने यापूर्वीच राज्य सरकारांना शत्रूंच्या मालमत्तेचा सार्वजनिक वापर करण्यास परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार शत्रु मालमत्ता आदेश २०१८ च्या विल्हेवाट लावण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले होते. 

 "