जयपूर : पुढरी ऑनलाईन
राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. बंडखोरीचा झेंडा हाती घेतलेले उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली. काँग्रेसच्या या निर्णयापूर्वी पायलट यांची पत्नी सारा पायलट यांनी ट्विट करत तिखट शब्दांत काँग्रेस आणि गेहलोत सरकारवर निशाणा साधला.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची मुलगी आणि पायलट यांची पत्नी सारा पायलट यांनी ट्विट करत राजस्थान सरकारवर हल्ला चढवला आहे. ''काँग्रेसमध्ये राहणे म्हणजे गांधी परिवार आणि गेहलोत यांचे तळवे चाटल्यासारखे आहे. आणि ते आम्हाला मंजूर नाही. मग याचे पडसाद काहीही उमटू देत. मात्र, वाघाने जंगलात खळबळ माजवली आहे.'' अशा आशयाचे ट्विट सारा यांनी आज सकाळी केले होते. तसेच, काही तासांपूर्वी ट्विट करत सारा यांनी, 'दिल दिया है। जान भी दुंगी। सचीन तेरे लिए।' असे म्हटले आहे.
जेव्हा सचिन पायलट दिल्लीत दाखल झाले. तेव्हा सारा यांनी ट्विट करत, जेव्हा दिल्लीकडे आम्ही वळतो तेव्हा मोठमोठ्या जादुगारांना घाम फुटतो असे म्हणत काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.