Wed, Sep 23, 2020 02:00होमपेज › National › सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई, राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून हटवलं

सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई, राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून हटवलं

Last Updated: Jul 14 2020 2:54PM

सचिन पायलटजयपूर : पुढारी ऑनलाईन

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकावणाऱ्या सचिन पायलट यांच्या विरोधात काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून तसेच राजस्थान प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता अध्यक्षपदी मंत्री गोविंद सिंह डोटसारा यांची निवड करण्यात आली आहे.

वाचा : पायलट यांना काॅंग्रेसमधून हटवा; गेहलोत समर्थक १०२ आमदार एकवटले

पायलट यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय मंत्री विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना देखील मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे. पायलट आणि त्यांचे काही निकटवर्तीय भाजपच्या षडयंत्रामुळे काँग्रेसमधून फुटले आणि त्यांनी राजस्थानमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मला दु:ख झाले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे.

वाचा : राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाचे धक्के सुरुच; गेहलोत सरकारमधील आणखी एक मंत्री पायलटांच्या गळाला

या सर्व घडामोडीतच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. गेहलोत यांनी येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळात फेरबदल करण्याबाबत राज्यपालांशी चर्चा केल्याचे समजते.  

गेहलोत आणि पायलट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु होता. हा संघर्ष गेल्या दोन दिवसांत तर आरपारच्या लढाईवर आला. याची गंभीर दखल घेत काँग्रेसने पायलट यांच्यावर कारवाई केली.  

वाचा : सचिन पायलट यांच्या पत्नीच्या 'त्या' ट्विटने खळबळ

 "