Mon, Aug 10, 2020 04:58होमपेज › National › फ्लॅटवर मदत मागायला आलेल्या नराधमाकडून बंगाली अभिनेत्रीवर बलात्कार!

फ्लॅटवर मदत मागायला आलेल्या नराधमाकडून बंगाली अभिनेत्रीवर बलात्कार!

Last Updated: Jul 10 2020 9:09PM
कोलकाता : पुढारी ऑनलाईन

कोलकात्यामध्ये एका २६ वर्षीय बंगाली अभिनेत्रीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच ही बाब इतरांना सांगितल्यास बलात्काराचा बनविण्यात आलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी संबधित नराधमाकडून पीडित अभिनेत्रीला देण्यात आल्याचे समोर आले. पीडित अभिनेत्रीकडून पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद करण्यात आली आहे.

अधिक वाचा : एका दिवसात ४७५ जणांचा बळी

कोलकत्यातील बिजयगड परिसरात ही पीडित अभिनेत्री राहते. तिच्या ओळखीचा एक व्यक्ती ५ जुलै रोजी तिच्याकडे मदत मागण्यासाठी ती राहत असलेल्या फ्लॅटमध्ये आला. घरी ती एकटीच असल्याचे पाहून त्या नराधमाने त्या अभिनेत्रीवर बलात्कार केला. शिवाय या कृत्याचा नराधमाने व्हिडिओही बनवला. या घटनेबाबत जर बाहेर सांगितले, तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या नराधमाने पीडित अभिनेत्रीला दिली. या घटनेनंतर ती अभिनेत्री गप्प राहिली व काही दिवसांनी ८ जुलै रोजी यासंबधीची तक्रार तेथील जाधवपूर पोलिस ठाण्यात दिली. 

अधिक वाचा : आशियातील सर्वांत मोठ्या सोलर प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

पीडित अभिनेत्री ही अभिनयात करिअर करण्यासाठी कोलकत्यात आली आहे. ती अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असून कोलकातामध्ये ती एकटीच राहत आहे. संबधित आरोपी हा तिच्याच क्षेत्रातील असून तो तिच्या चांगल्या परिचयाचा आहे. मधील काही काळात त्यांच्यात वाद झाल्याने त्यांचा संपर्क तुटला होता. मध्यतंरी लॉकडाऊनच्या काळात त्याच्यावर आर्थिक संकट आल्याने मदतीसाठी त्याने तिच्याशी संपर्क केला. दरम्यान, मदत मागण्यासाठी पीडित अभिनेत्रीच्या घरी आल्यावर त्या नराधमाने परिस्थितीचा फायदा घेत तिचे शोषण केले. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे.

अधिक वाचा : 'कार पलटलेली नाही, सरकार पलटण्यापासून वाचले'