Tue, Jun 15, 2021 12:24होमपेज › National › भाजपकडून मला भगव्‍या रंगात अडकवण्‍याचा प्रयत्‍न: रजनीकांत

भाजपकडून मला भगव्‍या रंगात अडकवण्‍याचा प्रयत्‍न: रजनीकांत

Last Updated: Nov 08 2019 6:10PM

रजनीकांतचेन्‍नई : पुढारी ऑनलाईन 

भाजपकडून मला भगव्‍या रंगात अडकवण्‍याचा प्रयत्‍न सुरू असल्‍या आरोप राजकारणात प्रवेश केलेले अभिनेते रजनीकांत यांनी केला आहे. भाजपकडून तमिळ कवी आणि ज्येष्ठ विचारवंत थिरुवल्लावर यांच्या बाबतीतही हेच करण्‍यात आले. पण आम्ही दोघेही भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही, असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भाजपकडून आपल्‍याला पक्षप्रवेशाची कोणतीच ऑफर आली नसल्‍याचेही त्‍यांच्‍याकडून स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. मला कोणत्‍या पक्षात प्रवेश करायचा आहे हे मी स्‍वत: ठरवेन असे रजनीकांत यावेळी म्‍हणाले. 

रजनीकांत यांच्‍याकडून आतापर्यंत मोदी सरकारच्‍या कामाचे कौतुक करण्‍यात आले आहे. यावरुन रजनीकांत यांच्‍यावर भाजपशी जवळीक असल्‍याची चर्चा व्‍हायची. पण आता मात्र त्‍यांनी भाजपच्‍या भगव्‍या जाळ्‍यात अडकणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

थिरुवल्लावर यांच्या पुतळ्याला तामिळनाडू भाजपकडून भगवी वस्त्र परिधान करण्यात आली. याला मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला. भाजप संतांनाही राजकारणात आणत असल्याचा आरोप डाव्या पक्षांसह डीएमकेनेही केला. 

थिरुवल्लावर कोण होते ?

थिरुवल्लावर यांचा जन्म मैलापूरमध्ये झाला. थिरुवल्लावर हे दोन हजार वर्षांपूर्वी तामिळनाडूचे प्रसिद्ध कवी होऊन गेले. त्यांनी १३३० पानांचे प्रसिद्ध थिरुक्कुराल हे धर्मनितीशास्त्र लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडून थायलंड दौऱ्यात तमिळ भाषेतील या धर्मनितीशास्त्राचे थाय भाषेत प्रकाशन करण्‍यात आले होते. 

तामिळनाडूमध्‍ये 2021 मध्‍ये विधानसभा निवडणूक आहे. अशा परस्‍थितीमध्‍ये रजनीकांत यांनी घेतलेली भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरु शकते.