Sat, Sep 19, 2020 07:27होमपेज › National › ...म्हणून बंड पुकारलं; सचिन पायलटांचा खुलासा

...म्हणून बंड पुकारलं; सचिन पायलटांचा खुलासा

Last Updated: Jul 15 2020 12:04PM
जयपूर : पुढारी ऑनलाईन

माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाने पायलट यांची पदावरून हाकलपट्टी केली. पक्षाच्या भूमिकेनंतर पक्षाअंतर्गत सुरू असलेले कलह चव्ह्याट्यावर आले. राजकारणाला कंटाळून सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असल्याची चर्चा राजकीय वुर्तळात रंगली. दरम्यान, सचिन पायलट यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पक्षात मिळत नसलेला सन्मान तसेच लोकांसाठी काम करण्यासाठी होत असलेली अडवणूक यावर भाष्य केले आहे. 

पायलट यांनी, मी अशोक गेहलोत यांच्यावर नाराज नाही असे स्पष्ट करत काँग्रेसने निवडणुकीत जी आश्वासने दिली होती ती त्यांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. या व्यतिरिक्त मी कोणतीही विशेष मागणी करत नसल्याचे पायलट यांनी म्हटले आहे. जेव्हा आम्ही बेकायदा उत्खननाविरोधात आवाज उठवला होता तेव्हा  तत्कालीन भाजप सरकारने वाटप रद्द केले आणि आता याच मार्गावर  सत्तेत आल्यानंतर अशोक गेहलोत आहेत, असा आरोप पायलट यांनी केला.

तसेच, अशोक गेहलोत मला आणि माझ्या समर्थकांना राजस्थानच्या विकासासाठी काम करण्यासाठी जागा आणि मान काहीही देत नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझे आदेश न पाळण्यास सांगण्यात आले आहे. कोणतीही फाइल माझ्याकडे पाठवली जात नाही. गेल्या कित्येक महिन्यात मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही. जर मी लोकांना दिलेलं आश्वासन पूर्ण करु शकत नसेल तर हे पद काय कामाचं? असा सवालही पायलट यांनी यावेळी केला. 

अनेकवेळा हा मुद्दा पक्षासमोर उपस्थित करण्यात आला. मात्र,  काँग्रेस पक्षात अंतर्गत चर्चा करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ राहिले नाही, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी काहीच केले नाही, असा आरोप पायलट यांनी यावेळी केला. तसेच, स्वाभिमान दुखावल्यानेच आपण कार्यकारिणी पक्षाच्या बैठकीत अनुपस्थित राहिल्याचे पायलट यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सचिन पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र,  पायलट हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते.

 "