Sun, Sep 20, 2020 06:05होमपेज › National › राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात; सचिन पायलट 'नॉट रिचेबल'

राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात; सचिन पायलट 'नॉट रिचेबल'

Last Updated: Jul 13 2020 11:36AM

सचिन पायलटजयपूर : पुढारी ऑनलाईन

राजस्थान काँग्रेसमधील वाद दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. परंतु बंडखोरीच्या मनस्थितीत असलेले सचिन पायलट या बैठकीत सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर आता ते पक्षाशी बोलण्यासाठी उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. प्रदेश काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनी सांगितले की, सचिन पायलट कॉल-मेसेजला उत्तर देत नाहीत. ते विधिमंडळ पक्षाच्या या बैठकीला येतील, अशी पक्षाची अपेक्षा आहे.

वाचा :गेहलोत यांच्या विश्वासातील नेत्यांच्या ठिकाणांवर आयकरचे छापासत्र 

मी सचिन पायलट यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. मी त्यांना मेसेजही पाठवला आहे. पण त्यांनी अजून कोणतेही उत्तर दिलेलं नाही. मी अपेक्षा करतोय की ते बैठकीसाठी येतील, असे राजस्थान प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी एका वृत्तवाहिनेशी बोलताना म्हटले आहे.  

जर काँग्रेसच्या कोणत्याही आमदार किंवा नेत्यांना काही अडचण असेल तर ते येऊन माझ्याशी बोलू शकतात आणि त्यावर कार्यवाही करू शकतात अशी परवानगी पक्षश्रेष्ठींकडून मिळाली असल्याचे पांड्ये यांनी म्हटले आहे. 

वाचा : अनंतनागमध्ये एक दहशतावादी ठार 

 "