Fri, Sep 25, 2020 15:30होमपेज › National › मजुरांचा वनवास काही संपेना; मुंबईतून उत्तर प्रदेशसाठी सुटली रेल्वे पण..

मजुरांचा वनवास काही संपेना; मुंबईतून उत्तर प्रदेशसाठी सुटली रेल्वे पण..

Last Updated: May 23 2020 5:16PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

आपण हे गाणे ऐकले असेलच, जायचे होते जपानला मात्र पाहोचलो चीनला. असाच काहीसा प्रसंग आपल्‍या देशातील मुंबईहून गोरखपुरसाठी रवाना झालेल्‍या श्रमिक रेल्‍वेच्या बाबतीत घडला. मुंबईहून सुटलेल्‍या या श्रमिक रेल्‍वेला गोरखपूरला पोहोचायचे होते, मात्र ही रेल्‍वे ओडिशाच्या रूरकेलामध्ये पोहोचली. यामुळे मुंबईहून वसई रोड- गोरखपुर रवाना झालेली श्रमिक विशेष रेल्‍वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्‍या कुटुंबियांजवळ पोहोचण्याचा प्रवास आणखी काही तासांसाठी लांबला. २१ मे ला मुंबई मधून गोरखपूरसाठी रवाना झालेली ही रेल्‍वेला शॉर्टकट रूटने पुढे जायाचे होते. मात्र रेल्‍वेने हा रूट बदलल्‍याने हा मार्ग खूपच लांबला. यामुळे ही रेल्‍वे ८ राज्‍यांना फेऱ्या मारून ओडिशाच्या रूरकेला मध्ये पोहोचली. प्रवाशांना ही गोष्‍ट समजताचं, रेल्‍वेने मोठे ट्रॅफिक असल्‍याने हा बदल केल्‍याचे सांगितले.  

हे प्रकरण तापल्‍यानंतर रेल्‍वेने केला खुलासा...

पश्चिम रेल्‍वेने केलेल्‍या खुलाशामध्ये सांगितले की, २१ मे ला रवाना झालेली वसई रोड-गोरखपूर श्रमिक विशेष रेल्‍वेच्या मार्गामध्ये बदल केला गेला आहे. रेल्‍वेच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, रेल्‍वेला ठरलेल्‍या मार्गात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असल्‍याने हा बदल करावा लागला. या रेल्‍वेला कल्‍याण, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, नैनी, दीन दयाल उपाध्याय जंक्‍शन वरून जात गोरखपूर पोहोचायचे होते. हा छोटा रस्‍ता नाही मात्र, रेल्‍वेने जो मार्ग ठरवला आहे त्‍याच मार्गावरून जावे लागते. त्‍यामुळे रेल्‍वे तीन राज्‍यातून जायचे होते. मात्र रेल्‍वेचा रूट बदलला. त्‍यामुळे ही रेल्‍वे अनेक राज्‍यांच्या फेऱ्या मारून ओडिशाला पोहोचली.  

ट्रॅफिक मुळे रेल्‍वेच्या मार्गात बदल... 

रेल्‍वेचे म्‍हणणे आहे की, इटारसी- जबलपूर- पंडित दीनदयाल उपाध्याय नगर या मार्गावर मोठ्या संख्येने श्रमिक रेल्‍वे चालत आहेत. त्‍यामुळे मोठे ट्रॅफिक झाले आहे. यामुळे रेल्‍वे बोर्डाने पश्मिम रेल्‍वेच्या वसई रोड, सुरत, वलसाड, अंकलेश्वर, कोंकण रेल्‍वे आणि सेंट्रल रेल्‍वेच्या काही स्‍टेशनवरून चालणाऱ्या रेल्‍वेंना सध्या बिलासपुर- झारसुगुडा- रूरकेला या मार्गावरून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

अनेक राज्‍यातून प्रवास करत श्रमिक रेल्‍वे पोहोचणार गोरखपूरला 

यामुळे वसई रोड- गोरखपूर श्रमिक विशेष रेल्‍वे आता बिलासपुर- झारसुगुडा- रूरकेला मार्गावर वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्‍यामुळे ही रेल्‍वे आता इटारसीहून बिलासूर, चाम्‍पा, झारसुगुडा, रूरकेला, आद्रा, आसनसोल,जसीडीह, झाझा, क्यूल, बरौनी, सोनपुर, छपरा, सीवान होत गोरखपूला पोहोचेल. पहिल्यांदा महाराष्‍ट्र आणि मध्ये प्रदेश मधून उत्‍तर प्रदेशला पोहोचायचे होते. मात्र आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल करत झारखंड आणि त्‍यानंतर बिहारमधून उत्‍तर प्रदेशमध्ये पोहोचणार आहे. 

३१ लाखापेक्षा अधिक श्रमिक प्रवाशांना रेल्‍वेने घरी पोहोचवले.

रेल्‍वेने १ मे पासून २, ३१७ श्रमिक विशेष रेल्‍वेच्या माध्यमातून ३१ लाखापेक्षा अधिक प्रवाशांना त्‍यांच्या गावापर्यंत पोहोचवल्‍याचे म्‍हटले आहे. ३१ लाख प्रवाशी श्रमिकांमध्ये जवळपास १२ लाख लोक उत्‍तर प्रदेश, ७ लाखापेक्षा अधिक बिहार तर झारखंड आणि राजस्‍थानातील एक-एक लाख लोकांचा समावेश आहे. रेल्‍वेच्या म्‍हणण्यानुसार वेळ पडली तर, रेल्‍वे दररोज ३०० रेल्‍वे चालवू शकते. 

 "