Thu, Jul 02, 2020 23:53होमपेज › National › राहुल गांधी Live : लॉकडाऊन फेल गेले, पुढचा काय प्लॅन?

राहुल गांधी Live : लॉकडाऊन फेल गेले, पुढचा काय प्लॅन?

Last Updated: May 26 2020 12:32PM
नवी दिल्ली :  पुढारी ऑनलाईन 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधत भारतात लॉकडाऊन फेल गेल्याची टीका केली. त्यांनी भारतात ६० दिवसानंतरही झपाट्याने वाढत असलेल्या रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त करत भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्यात गुणाकार वाढत असताना लॉकडाऊन उठवले असे वक्तव्य केले. 

ते पुढे म्हणाले की भारतात लॉकडाऊन फेल गेले आहे. आता सरकारने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी त्यांची पुढची रणनिती काय आहे हे सांगावे. पंप्रधान पहिले दोन लॉकडाऊन फ्रंट फूटवर खेळले आता ते बॅकफूटवर गेले आहेत. असेही राहुल गांधी यांनी वक्तव्य केले.

Live :