Sun, Oct 25, 2020 07:51होमपेज › National › उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे सापडला मध्य प्रदेशात पण...

उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे सापडला मध्य प्रदेशात पण...

Last Updated: Jul 09 2020 6:11PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये आठ पोलिसांची हत्या करण्यात आली. या शुटआऊटचा मुख्य आरोपी गुंड विकास दुबेच्या अटकेनंतर आता प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत. एकीकडे पोलिस त्याला अटक म्हणून केली म्हणून घोषित करत आहेत, तर विरोधी पक्ष त्याला आत्मसमर्पण म्हणत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही विकास दुबेच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वाचा : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

प्रियांका गांधी यांनी ट्विट करुन हा प्रश्न उपस्थित केला. एवढी सतर्कता असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहचणे, फक्त सुरक्षेच्या दाव्याची पोलखोल करत नाही तर एकमेकांचे लागेबांधे असल्याकडे इशारा करत आहे. तीन महिन्यांपूर्वीच्या जुन्या पत्रावर कोणतीही कारवाई नाही आणि कुख्यात गुन्हेगारांच्या यादीत समावेशही नाही. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे लांबपर्यंत असल्याचे दिसून येते. युपी सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असेही पुढे प्रियांका गांधी यांनी लिहिले आहे. 

'कानपूर-कांड'चा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची बातमी येत आहे. जर हे सत्य असेल तर सरकारने ते स्पष्ट केले पाहिजे की ते आत्मसमर्पण आहे की अटक आहे. त्याच्या मोबाईलची सीडीआर देखील सार्वजनिक करा जेणेकरून खऱ्या एकमेकांचे लागेबांधेचा भांडाफोड होऊ शकेल. असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले.

कानपूर गोळीबारात शहीद झालेल्या सीओ देवेंद्र मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी विकास दुबेच्या नाट्यमय अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीओचे नातेवाईक कमलकांत म्हणाले की, 'बरेच गुन्हेगार राज तुरूंगातून चालवत आहेत. विकास १२ तासांपूर्वी फरीदाबादमध्ये होता आणि तत्काळ उज्जैनला पोहोचला. त्याचे नियोजित पद्धतीने आत्मसमर्पण करण्यात आले. अटकेसाठी कोणते पोलिस मीडियाला सोबत घेऊन जातात, असेही त्यांनी म्हटले आहे. 

विकास दुबेला अटक करण्यासाठी युपी पोलिस देशातील अनेक राज्यांमध्ये शोध घेत होते. दोन दिवसांपूर्वी तो फरिदाबामध्ये दिसला. त्याचवेळी, युपी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर एमपीचे पोलिसही सतर्क झाले होते. पोलिसांनी विकास दुबेला अटक केली, असा दावा उज्जैन पोलिस करीत आहेत. परंतु प्रत्यक्षदर्शी म्हणतात की विकास दुबेने स्वत: आपली ओळख उघडकीस आणली होती.

फरीदाबादहून उज्जैनला जाण्यासाठी ७५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. विकास दुबे रस्त्याने उज्जैनला पोहचला. यावेळी सर्व गुप्तचर संस्था काय करीत होत्या हा प्रश्न आहे. 

हे होत आहेत प्रश्न उपस्थित 

१. एवढी सतर्कता असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचल कसा ?

२. हे आत्मसमर्पण आहे की अटक सरकारने स्पष्ट केले पाहिजे ?

३. अटक करत असताना मीडिय सोबत का होती ?

४. विकास दुबेने स्वत:ची स्वत: ओळख उघड केली?

५. सुरक्षा यंत्रणेला सुगावा का लागला नाही?

६.विकास दुबेला अटक करत असताना तो निवांत असल्याचे व्हिडिओत दिसते ? 

७. अटकेपूर्वी मंदिरात फोटो काढले?

८. मंदिरात अटक का? विकास दुबेला एन्काउंटरची भीती वाटत होती?

९. फरीदाबाद आणि उज्जैनला जाण्यासाठी कोणी मदत केली?

१०. शुआऊटनंतर विकास दुबे कुठे राहत होता? 

वाचा : 'कोरोना महामारीने भारताची 'फार्मा ॲसेट' जगाला दाखवून दिली'

 "