Sat, Jul 04, 2020 07:34होमपेज › National › हार्दिक पटेलच्‍या अटकेप्रकरणी  प्रियांका गांधींनी भाजपवर साधला निशाणा

हार्दिक पटेलच्‍या अटकेप्रकरणी  प्रियांका गांधींनी भाजपवर साधला निशाणा

Last Updated: Jan 19 2020 12:57PM

हार्दिक पटेलच्‍या अटकेप्रकरणी  प्रियांका गांधींनी भाजपवर साधला निशाणानवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना शनिवारी रात्री अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाव येथून देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्‍यात आली आहे. यावर काँग्रेसच्‍या सरचिटणीस प्रियांका गांधी -वधेरा यांनी भाजपवर निशाणा साधत संताप व्‍यक्‍त केला आहे. समाजातील एकाद्‍या प्रश्‍नावर आवाज उठवणार्‍यांना भाजप देशद्रोह म्‍हणत असल्‍याचे प्रियांका गांधी यांनी म्‍हटले आहे. यासंबंधी त्‍यांनी एक ट्‍वीट केले आहे. 

►देशद्रोहाच्या प्रकरणात हार्दिक पटेलला अटक

प्रियांका गांधी यांनी ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे की, तरुणांच्‍या रोजगारासाठी आणि शेतकर्‍यांची हक्‍कासाठी लढत असलेले हार्दिक पटेल या तरुणास  भाजपकडून सारखा -सारखा त्रास दिला जता आहे.  हार्दिकने त्‍याच्‍या समाजातील लोकांसाठी आवाज उठविला. त्‍यांच्‍यासाठी नोकरी, शिष्‍यवृत्‍ती याची मागणी केले. तसेच शेतकर्‍यांच्‍या हक्‍कासाठी आंदोलन केले.   भाजप यालाच 'देशद्रोह' म्‍हणत असल्‍याचे प्रियांका गांधी यांनी म्‍हटले आहे. 

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना शनिवारी रात्री  2015 च्या एका देशद्रोहाच्या प्रकरणी  अटक करण्‍यात आली आहे. देशद्रोहाच्या प्रकरणात हार्दिक पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. 

हार्दिक पटेल यांच्‍यावर का दाखल करण्‍यात आला होता देशद्रोहाचा गुन्‍हा?

25 ऑगस्ट 2015 रोजी पाटीदार आरक्षण समर्थनार्थ  हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथे एक रॅली काढली होती. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. त्यावेळी पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी हार्दिक आणि सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

► लोकसंख्या नव्हे तर बेरोजगारी ही समस्‍या : ओवैसी