नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
देशात कोरोनाचे रुग्ण वाढले होते तेव्हा सरकारी रुग्णालयात बेड शिल्लक नव्हते. तेव्हा खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून जास्त पैसे घेतल्याचा खुलासा झाला आहे. हा खुलासा केंद्राच्या एका समितीने केला आहे. आरोग्य विषयक स्थायी लोकसभा समितीचे अध्यक्ष रामगोपाल यादव यांनी कोविड -१९ च्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव व व्यवस्थापनाचा अहवाल राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकया नायडू यांना सादर केला आहे.
या अहवालात असे म्हटले आहे की कोविडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी काही मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे रुग्णांना अत्यधिक फी भरावी लागली आहे. सरकारी रुग्णालयात आरोग्य सुविधेची कमतरता लक्षात घेता सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये अधिक चांगली भागीदारी आवश्यक असल्याचे समितीने यात सांगितले आहे.
ज्या डॉक्टरांनी या महामारीत जीव गमावला आहे त्या डॉक्टरांना शहीद घोषित केले पाहिजे. आणि त्यांच्या परिवाराला पुरेसा मोबदला दिला पाहीजे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आरोग्यावर खर्च करणे हा अत्यंत कमी आहे. साथीच्या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी भारतीय आरोग्य यंत्रणेच्या परिस्थीतीमुळे महामारी विरोधात लढायाला अडचणी येतात. असेही समितीने म्हटले आहे .
वाचा : बारा तासांच्या कार्यदिवसाचा प्रस्ताव
वाचा : कोरोना म्हणतोय मी पुन्हा येईन! ८० टक्के जनतेला संक्रमणाला धोका