Thu, Jan 28, 2021 08:25होमपेज › National › बँकिंग क्षेत्रात भांडवली तुटवड्याची शक्यता!

बँकिंग क्षेत्रात भांडवली तुटवड्याची शक्यता! 

Last Updated: Jul 02 2020 4:00PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली :  पुढारी वृत्तसेवा 

कोरोना महारोगराईच्या सकंटामुळे ओढावलेले लॉकडाऊन तसेच इतर काही कारणांमुळे भारतीय बॅंकिंग क्षेत्राला भांडवली तुटीचा सामना करावा लागू शकतो. रेटिंग एजन्सी 'फिच रेटिंग्ज' ने ही भाकीत वर्तवली आहे. भारतीय बॅंकांना कमीत कमी १५ अब्ज डॉलर एवढ्या भांडवली तुटीचा सामना करावा लागू शकतो. या तुटीचा सर्वाधिक फटका देशातील मध्यमवर्गीयांना बसण्याची शक्यता आहे.

वाचा : ईडीची टीम तिसऱ्यांदा अहमद पटेल यांच्या घरी

देशांतर्गत अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून सावरत वेळीच पाय रोवू शकली नाही, तर भांडवली तूट ही ५८ अब्ज डॉलरपर्यंत पोहचू शकते. अशा काळात सरकारी बॅंकांना पुनर्भांडवलीकरण करण्याची गरज भासेल. सरकारी बॅंकांमध्ये असलेली भांडवली जोखीम ही खासगी बॅंकांच्या तुलनेत अधिक असल्याने अशी स्थिती निर्माण होईल, असे बोलले जात आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत २०२२-२३ मध्ये ५.५ टक्के दराने वाढ होईल, अशी शक्यताही अहवालातून वर्तवण्यात आली आहे. देशांतर्गत कोरोनाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. पंरतु, अद्यापही म्हणावे तेवढे यश सरकारला मिळालेले नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेला त्यामुळे फटका बसल्याची भीती फिचने त्यांच्या 'ग्लोबल इकोनॉमीक्स सिनॅरिओ'च्या जून महिन्यातील अहवालातून व्यक्त केली आहे. 

वाचा : लडाखला भूकंपाचा सौम्य धक्का