Thu, Jan 21, 2021 01:23होमपेज › National › पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधीत करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधीत करणार

Last Updated: Jun 30 2020 9:37AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान मोदी मंगळवारी दुपारी ४ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या भाषणात मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. देशात कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या ५ लाखांवर गेला आहे. दुसरीकडे, भारत-चीन सीमेवर तणाव आहे. त्यामुळे मोदी कोणत्या विषयावर संवाद साधणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्य यांच्यातील झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. 

१ जुलैपासून देशात अनलॉक २.० ला सुरूवात होणार आहे. तर महाराष्ट्राने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. आता भारतासाठी पंतप्रधान मोदी काय निर्णय घेणार, हे महत्वाचं ठरणार आहे.

चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी अलीकडेच भारताने लडाख सीमेवर सैनिकांची तसेच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती वाढविली आहे. चीनला धडा शिकविण्याचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने सोमवारी रात्री ५९ चिनी ॲपवर बंदी घातली आहे.