होमपेज › National › 'विद्यार्थ्यांवर पालक व शिक्षकांनी दबाव टाकू नये'

'विद्यार्थ्यांवर पालक व शिक्षकांनी दबाव टाकू नये'

Last Updated: Jan 20 2020 2:52PM

विद्यार्थ्यांवर पालक व शिक्षकांनी दबाव टाकू नये-पंतप्रधाननवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशाने खचून जाऊ नये असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी इतर उपक्रम सुद्धा करणे गरजेचे असल्‍याचे सांगत पालक व शिक्षकांनी त्‍यांच्‍यावर दबाव न टाकण्‍याचा सल्‍ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  दिला. 

►'चांद्रयान २' सॉफ्ट लँडिंगचा पीएम नरेंद्र मोदींकडून उल्लेख

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी म्‍हणाले की, आज तुमच्याकडे अनेक संधी आहेत. त्यामुळे तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते. मात्र, तुम्ही इतर अॅक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. आजकाल पालकांसाठी अशा अॅक्टिव्हिटी फॅशन बनली आहे. विद्यार्थ्यांचा रस कशात आहे हे ओळखून पालकांनी त्याला त्याच कामासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. पण अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी करणे गरजेचे आहे. जर आपण शाळेच्या जीवनातच पूर्ण जीवनाचा आनंद घेता त्याचा पुढील जीवनात तुम्हाला खूपच फायदा होतो. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी तर इतर अॅक्टिव्हिटी केल्याच पाहिजेत त्यामुळे तुमचा ताण हलका होईल.

►विद्यार्थ्यांनी झुंजार वृत्तीच्या अनिल कुंबळेचा आदर्श घ्यावा : पंतप्रधान मोदी

यासोबतच पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्या पाल्याची एखादा विषय शिकण्याची किती क्षमता आहे हे तपासायला हवे. लहान असताना आपण मुलांना ज्या प्रेमाने प्रोत्साहित करीत गोष्टी शिकवत होतो. तशाच प्रकारे मुले मोठी झाल्यानंतरही त्यांना त्याचप्रमाणे प्रेरीत करीत रहा. याला शेवटपर्यंत सोडू नका. पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांवर दबाव न टाकता प्रोत्साहीत केले पाहिजे, असा सल्‍ला देखील यावेळी पंतप्रधान मोदींकडून पालकांना व शिक्षकांना देण्‍यात आला.