Sun, Oct 25, 2020 07:17होमपेज › National › पेट्रोल- डिझेल दरात आणखी कपात

पेट्रोल- डिझेल दरात आणखी कपात

Last Updated: Sep 18 2020 1:45PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून शुक्रवारी पेट्रोलच्या दरात 26 पैशांची तर डिझेल दरात 35 पैशांची कपात करण्यात आली. ताज्या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे लिटरचे दर 81.14 रुपयांपर्यंत खाली आले असून डिझेलचे लिटरचे दर 72.02 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. 

मुंबईत पेट्रोलचे दर 87.82 रुपयांपर्यंत कमी झाले असून डिझेलचे दर 78.48 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. प. बंगालमधील कोलकाता येथे एक लिटर पेट्रोलचे दर 82.67 रुपयांवर आले आहेत आणि डिझेलचे दर 75.52 रुपयांवर आले आहेत. चेन्नई येथे पेट्रोल, डीझेलचे दर क्रमशः 84.21 आणि 77.40 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. अन्य महानगरांचा विचार केला तर दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथे पेट्रोलचे दर 81.64 रुपयांवर, रांची येथे 80.79 रुपयांवर, लखनौ येथे 81.54 रुपयांवर आले आहेत.

 "