Sat, Oct 24, 2020 23:18होमपेज › National › केंद्रीय मंत्री रामविलास यांची प्रकृती नाजूक; मुलाने लिहिले भावनिक पत्र

केंद्रीय मंत्री रामविलास यांची प्रकृती नाजूक; मुलाने लिहिले भावनिक पत्र

Last Updated: Sep 21 2020 10:27AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

एकीकडे बिहार विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापले आहे तर दुसरीकडे लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवन यांनी प्रकृती अधिक नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा मुलगा चिराग पासवन यांनी आपल्या पक्ष नेत्यांना व कार्यकर्त्यांना एक भाविनक पत्र लिहिले आहे. 

काय म्हटले आहे पत्रामध्ये? 

आज मी हे पत्र लिहित असताना, वडिलांना रोज आजाराशी लढताना पाहत आहे. एक मुलगा या नात्याने वडिलांना रुग्णालयात पाहून अतिशय अस्वस्थ वाटत आहे. गेल्या तीन आडवड्यांपासून दिल्लीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एकीकडे बिहार निवडणूक जवळ आली आहे. दुसरीकडे माझ्या वडिलांची प्रकृती नाजूक झाली आहे. त्यामुळे मला पाटणाला येणे अशक्य आहे. वडिलांनी मला अनेकदा पाटणा येथे जाण्याचा सल्ला दिला. मात्र, मुलगा या नात्याने वडिलांना आयसीयूमध्ये सोडून कुठेही जाणे माझ्यासाठी शक्य नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मला त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. नाहीतर तुमचा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला माफ करू शकणार नाही.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मला पक्षाच्या त्या सहकाऱ्यांची देखील चिंता आहे. ज्यांनी आपले जीवन ‘प्रथम बिहार प्रथम बिहारी’ यासाठी समर्पित केले आहे. याचवेळी त्यांनी पक्ष नेत्यांसह कार्यकर्त्यांना बिहार विधानसभा निवडणुकीला घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जागा वाटपाबाबत आतापर्यंत काहीच चर्चा झाली नसल्याचेही सांगितले आहे.

 "