Sun, Feb 28, 2021 06:37
'कोरोनामुळे माझ्या पत्नीचे चुंबनही घेऊ शकलो नाही'; फारूक अब्दुल्लांच्या वक्तव्याने उपस्थितीतांमध्ये हशा

Last Updated: Jan 18 2021 8:25AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन 

रविवारी दिल्ली येथे पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी केलेल्या एका गमतीदार वक्तव्याने उपस्थितांना मनमुराद हसण्यास भाग पडले. आपल्या बेधडक आणि रोखठोक वक्तृत्व शैलीकरिता प्रसिद्ध असणाऱ्या फारूक अब्दुल्लांचे हे वक्तव्य उपस्थितांसाठी आश्चर्यकारक ठरलं. (not even kiss my wife because of this pandemic, said farooq abdulla)

अधिक वाचा:कोरोनाविरुद्ध भारताचा यशस्वी लढा : अमित शहा

आपल्या भाषणात बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, "कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे एका विचित्र परिस्थितीला मला सामोरे जावे लागले. मला माझ्या पत्नीचे चुंबनही घेता आले नाही. परिस्थितीच अशी आली आहे की मी एखाद्याची गळाभेट घेण्यासाठी सुद्धा घाबरतो." 

यावेळी त्यांनी आपल्या भाषणात काश्मीरशी संबंधित अनेक मुद्द्यांना देखील हात घातला. मात्र सध्या त्यांच्या 'या' विशेष वक्तव्याची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.