Thu, Sep 24, 2020 09:44होमपेज › National › निर्भयाच्या दोषींना माफ करा; वकील इंदिरा जयसिंह यांचा अजब सल्ला

निर्भयाच्या दोषींना माफ करा; वकील इंदिरा जयसिंह यांचा अजब सल्ला

Last Updated: Jan 18 2020 11:46AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना माफ करा असा अजब सल्ला निर्भयाची आई आशा देवी यांना दिला आहे. परंतु ज्येष्ठ वकील जयसिंह यांचा सल्ला धुडकावत यांसारख्याच लोकांमुळे बलात्काराच्या घटना थांबेनात, असा आरोप केला आहे.  

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे की मी आशा देवी यांचे दु:ख समजते. तरी सुद्धा मी त्यांना सांगेन की, सोनिया गांधी यांनी आपण मृत्यूदंडाच्या विरोधात आहे, असे सांगत राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी नलिनीला माफ केले होते. तसेच, निर्भयाच्या आईने केले पाहिजे. आम्ही आपल्या सोबत आहेत. मात्र, मृत्युदंडाच्या विरोधात आहोत, असे म्हटले आहे. 

ज्येष्ठ वकील जयसिंह यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आशा देवी यांनी ज्येष्ठ वकील जयसिंह यांसारख्याच लोकांमुळे न्याय मिळत नसल्याचे म्हटले आहे. तसेच, मला अशाप्रकारे सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत? असा सवाल करत संपूर्ण देशाला वाटते की, दोषींना फाशी झाली पाहिजे. माझा विश्वास बसत नाही त्यांनी अशाप्रकारे प्रतिक्रीया दिली आहे. निर्भया प्रकरणी मी अनेकवेळा त्यांची सर्वोच्च न्यायालयात भेट झाली आहे.  कोणताच विचार न करताच त्या दोषींची बाजू मांडत आहेत. यांसारख्याच लोकांमुळे बलात्काराच्या घटना थांबेनात, असा आरोपही आशा देवी यांनी ज्येष्ठ वकील जयसिंह यांच्यावर केला आहे. 

 "