Thu, Aug 13, 2020 16:55होमपेज › National › अरुणाचल प्रदेशमध्ये सहा बंडखोर ठार

अरुणाचल प्रदेशमध्ये सहा बंडखोर ठार

Last Updated: Jul 11 2020 12:27PM
इटानगर (अरुणाचल प्रदेश) : पुढारी ऑनलाईन

आसाम रायफल्स आणि अरुणाचल प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज शनिवारी (दि. ११) पहाटे ४. ३० वाजता वाजता केलेल्या कारवाईत एनएससीएन (आयएम) च्या सहा बंडखोरांना ठार केले. यावेळी आसाम रायफल्सचे एक जवान जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून ४ एके-४७ आणि दोन चिनी एमक्यू जप्त केल्या आहेत. या भागात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे.

अरुणाचल प्रदेशातील लाँगिंग जिल्ह्यातील निगिनू गावाजवळ बंडखोरांच्या हालचाली सुरु असल्याची माहिती राज्य गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर आसाम रायफल्स आणि अरुणाचल प्रदेश पोलिसांनी पहाटे कारवाई सुरु केली. या कारवाई दरम्यान सहा बंडखोरांना ठार करण्यात आले. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक आर. पी. उपाध्याय यांनी दिली आहे.