Thu, Dec 12, 2019 23:56होमपेज › National › बंगालमध्ये संघ कार्यकर्त्याची गर्भवती पत्नी, मुलासह हत्या

बंगालमध्ये संघ कार्यकर्त्याची गर्भवती पत्नी, मुलासह हत्या

Last Updated: Oct 11 2019 1:52AM
कोलकाता : वृत्तसंस्था

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे अज्ञात हल्लेखोरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून त्याच्यासह पत्नी आणि मुलाची हत्या केली आहे. प्रकाश पॉल असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते 20 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गर्भवती पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलासह ते जियागंज परिसरात राहत होते.

भाजपचे बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट केले आहे की, याहून घोर अपराध काय असेल. जिथे सामान्य माणसाचे जीवन सुरक्षित नाही, ती व्यवस्था चांगली कशी असेल? दीदी, आपल्या राज्यात हे काय चालू आहे?   राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनीही याची दखल घेत मुख्यमंत्री आणि डीजीपी यांना पत्र लिहून तत्काळ अटकेची मागणी केली आहे.