Sat, Sep 19, 2020 08:33होमपेज › National › शाळेपेक्षा शिक्षण सुरु करण्यावर माझा भर : मुख्यमंत्री 

शाळेपेक्षा शिक्षण सुरु करण्यावर माझा भर : मुख्यमंत्री 

Last Updated: Jul 25 2020 10:11AM
 

 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सामनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्य सरकार कोरोनाच्या संकटकाळत अनेक समस्यांवर कसा मार्ग काढत आहे याची माहिती दिली. त्यांनी अनेक मुद्यांबरोबच शिक्षण आणि अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत आपली भूमिका काय आहे हे स्पष्ट केले. त्यांनी या शाळा कधी सुरु होणार यावर उत्तर देताना शाळा कधी सुरु या पेक्षा शिक्षण कधी सुरु हा महत्वाचा मुद्दा असल्याचे सांगितले. 

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत आज ( दि. 25 ) प्रसिद्ध झाली. यावेळी संजय राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमध्ये शाळेचा आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. असे मत व्यक्त केले तसेच राज्यातील थांबलेल्या शिक्षण सुरु करण्याबाबत राज्य सरकार काय करत आहे, असा प्रश्न विचारला.

या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'शाळा सुरु करण्याबाबत अनेक मत मतांतरे आहेत. जसे लॉकडाऊनबाबत मत मतांतरे आहेत तसेच शाळा सुरु करण्याबाबत परीक्षा घेण्याबाबत मत मतांतरे आहेत. काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या आणि तेथील मुले बाधित झाल्याने पुन्हा त्या बंद कराव्या लागल्या. मुलांना कोरोना होत नाही असे कोणीही समजू नका. सहा महिन्याच्या बाळालाही कोरोना झाला होता. सुदैवाने तो त्यातून बरा झाला.' असे सांगितले. 

वाचा :  फडणवीसांच्या दिल्लीवारीवर मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला, म्हणाले... 

याचबरोबर तरुणांच्या आणि मुलांच्या शिक्षणाचं काय होणार या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की 'हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी आम्ही खूप विचार करुन काम करत आहोत. जूनमध्ये तर शाळा सुरु होतात आता तर जुलै संपत आला आता शाळा कधी सुरु होणार? या प्रश्नावर मी माझी संकल्पना मांडली की शाळा ही अस्तित्वात असलेली संकल्पना तुर्तास बाजूला ठेवा शिक्षण कधी सुरु होणार हा करा मुद्दा आहे आणि याच्यावरच माझा भर आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील शाळा सुरु कराव्यात का हाही विचार सुरु आहे. जिथे शक्य आहे तेथे ऑनलाईन शिक्षण सुरु करावे का? ऑनलाईन शिक्षणाचे आपल्याकडे चांगले फायदे झाले आहेत. याबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरु आहे. आता शिक्षण एकतर्फीच होणार माझे फेसबुक लाईव्ह जसे होते तसेच ते होणार. टीव्ही चायनलवरुन शिक्षण देता येईल का यावरही काम करत आहोत. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत आम्ही एसडी कार्ड लोड करुन टॅब दिले होते. त्यात ई लर्निंग आहे, पाठ्यपुस्तकं आहेत तसाही प्रयत्न होतोय.ई लर्निंग शिवाय आता पर्याय नाही.'

त्यानंतर उद्धव ठाकरे यांना राज्यपाल आणि युजीसीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत वेगळी भुमिका मांडली आहे. त्यातून कसा मार्ग काढणार याबाबत विचारले असता त्यांनी 'आपण मार्ग काढला आहे. जसे लॉकडाऊन करावा की नाही याबाबत मत मतांतरे आहेत तसेच परिक्षा घ्यावी की नाही याबाबत मत मतांतरे आहेत. पण मी काय म्हणतोय ते नीट लक्षात घ्या. आपण अंतिम वर्षाच्या मुलांना आतापर्यंत ज्या सेमिस्टर झाल्या आहेत त्याचे अॅग्रीगेट करुन मार्क देणार त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अडथळा दूर करावा. जर कोणाला वाटले की मी यापेक्षाही चांगली कामगिरी करु शकतो. त्यांच्यासाठी जेव्हा शक्य होईल त्यावेळी त्यांची परिक्षा घेऊ. पण त्यावेळी त्यांना एकच निर्णय घ्यावा लागेल अॅग्रीगेट मार्क घ्यावेत की परिक्षेला बसावे. 

 "