आसाममध्ये भूस्खलनात २० जणांचा मृत्यू 

Last Updated: Jun 02 2020 2:38PM
Responsive image


गुवाहाटी : पुढारी ऑनलाईन 

आसाममध्ये आज ( दि.२)  झालेल्या भूस्खलनात जवळपास २० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दक्षिण आसाममधील बरख खोऱ्यात असणाऱ्या जिल्ह्यातील अनेकांचा समावेश आहे. दरम्यान माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. 

या भूस्खलनात मृत्यू झालेल्यांमध्ये कचर जिल्ह्यातील ७, हैलाकांडी जिल्ह्यातील ७ तर करीमगंज जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश आहे. दोन दिवस या भागात जोरदार पाऊस पडला होता. 

ईशान्य भारतातील राज्ये आधीच मोठ्या पुरामुळे हैराण झाली आहेत. या पूरामुळे जवळपास ३.७२ लाख लोक प्रभावित झाले आहेत. गोलपारा जिल्ह्याला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यानंतर नागाव आणि होजै हे जिल्हेही पूरच्या कचाट्यात सापडले आहेत. या पूरात जवळपास ६ लोकांचा मृत्यू झाला असून ३४८ गावे पाण्याखाली गेली आहेत. तर जवळपास २७ हजार हेक्टर जमिनीवरील पीकांचे नुकसान झाले आहे.