Tue, Jun 15, 2021 13:29
कोरोना योद्ध्यांचा लडाखमधील प्रवास

Last Updated: Jun 10 2021 3:49PM

लेह; पुढारी ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य क्षेत्रातील कोरोना योद्धे आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा करत आहेत. हे कोरोना योद्ध्ये तोकडी साधन सामुग्री, तोकडे मनुष्यबळ आणि तोकड्या सोयी सुविधांनिशी या कोरोनाच्या अजस्त्र लाटेला थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण, सोशल मीडियावर पीपीई कीट घालून दिवसातले १८ तास काम करणाऱ्या, घामाने निथळणाऱ्या डॉक्टरांना पाहिले. कोरोना सारख्या सर्वात वेगाने प्रादुर्भाव करणाऱ्या विषाणूच्या सानिध्यात काम करणाऱ्या डॉक्टरांना आपली गाडीच आपले घर बनवल्याचे आपण पाहिले आहे. 

आता असाच कोरोना योद्ध्यांचा त्यांच्या कामप्रती समर्पण दर्शवणारा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लडाखमधील ग्रामीण भागात कोरोना योद्धे आपले कर्तव्य बजावण्यासाठी जेसीबीच्या माती उपसणाऱ्या लोडरमध्ये बसून जातानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हे कोरोना योद्धे या जेसीबीमधून एक नदी पार करताना दिसत आहेत.

हाच फोटो लडाखचे खासदार जामयांग तेसरिंग नामयाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. या फोटोला त्यांनी 'आपल्या कोरोना योद्ध्यांना सलाम #कोरोनायोद्धे कोरोना योद्ध्यांची एक टीम लडाखमधील ग्रामीण भागात आपली सेवा देण्यासाठी नदी पार करत आहे. घरात रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा आणि कोरोना योद्ध्यांना सहकार्य करा.' असे कॅप्शन दिले. 

या ट्विटवर एका नेटकऱ्याने हा फोटो सहजपणे वर्षातील सर्वश्रेष्ठ फोटो होऊ शकतो.