नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
कपील सिब्बल यांनी काँग्रेसला पुन्हा घरचा आहेर दिला आहे. आता त्यांनी काँग्रेस हा पक्ष देशातील प्रभावी विरोधक पक्ष राहीलेला नाही अस त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस मधील अंतर्गत वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
काँग्रेस आपली संघटना मजबूत करण्यासाठी कोणाताच प्रयत्न करत नाही. त्यांनी एका वर्षापेक्षाही जास्त दिवस झाले तरीही काँग्रेस अध्यक्ष निवडलेला नाही. यावर त्यांनी नाराजी दर्शवली आहे. "अध्यक्ष नसल्याशिवाय दीड वर्ष राजकीय पक्ष कसे काम करू शकेल असा प्रश्नही सिब्बल यांनी विचारला आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकांवरून हे स्पष्ट झाले की यूपीसारख्या राज्यात काँग्रेसचा कोणताही प्रभाव राहिलेला नाही. याखेरीज गुजरात आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यात जिथे काँग्रेस थेट भाजपचा सामना करीत होती, तेथे त्यांचे निकाल फार वाईट लागले आहेत. आम्ही गुजरातमधील आठही जागा गमावल्या आहेत. असेही सिब्बल म्हणाले.
वाचा : कोरोना म्हणतोय मी पुन्हा येईन! ८० टक्के जनतेला संक्रमणाला धोका