Thu, Aug 13, 2020 17:16होमपेज › National › जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये ३ दहशतवादी ठार 

अनंतनागमध्ये ३ दहशतवादी ठार 

Last Updated: Jul 13 2020 1:10PM
श्रीनगर : पुढारी ऑनलाईन 

अनंतनागमधील श्रीगुफवाडा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. अनंतनागमधील श्रीगुफवाडा परिसरात ही चकमक झाली, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. आज सकाळी अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफवाडामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन-तीन दहशतवाद्यांना घेरलं होतं. दोन्हीकडून गोळीबार सुरू होता. सुरक्षा दलाच्या जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यातील एक विदेशी होता, असे होता. 
जवानांनी आजूबाजूच्या परिसरालादेखील घेराव घातला असून शोधमोहिम सुरू आहे.