Wed, Aug 12, 2020 09:33होमपेज › National › श्रीलंकेतील स्फोटानंतर भारतीय तटरक्षक दलाने वाढवला बंदोबस्त

श्रीलंकेतील स्फोटानंतर भारतीय तटरक्षक दलाने वाढवला बंदोबस्त

Published On: Apr 22 2019 7:47PM | Last Updated: Apr 22 2019 7:47PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण जग हादरले. या घटनेचे गांभिर्य ओळखत भारताने सतर्क राहताना अधिक कडक पावले उचलली आहेत. श्रीलंकेला लागून असणाऱ्या सागरी सीमांवर भारतीय तटरक्षक दलास हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सागरी मार्गाने या हल्ल्यातील हल्लेखोर पळून जाऊ नयेत अथवा भारतात घुसू नयेत याची दक्षता भारतीय तटरक्षक दलाने घेतली आहे. यासाठी तटरक्षदलाने आपला बंदोबस्त वाढवला असून अनेक ठिकाणी गस्त घालण्यासाठी डॉनिर्यर विमाने आणि जहाजे तैनात ठेवली आहेत. 

भारतातमध्ये जेव्हा २६ / ११ चा हल्ला झाला तेव्हा हल्लेखोर हे सागरी मार्गानेच भारतामध्ये शिरले होते. या पार्श्वभूमीवर तसेच श्रीलंकेत हल्ला करणारे हे सागरी मार्गान पळून जाऊ नयेत आणि सागरी मार्गाने भारतात घूसू नयेत यासाठी विषेश दक्षता तटरक्षक दलाकडून घेण्यात येत आहे. भारतीय तटरक्षक दलाकडून तुतीकोरीन, मांडपम आणि करिकल या सागरी किनाऱ्यांवर अधिक जहाजांची देखरेख ठेवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

रविवारी इस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेमध्ये झालेल्या आठ साखळी बॉम्बच्या स्फोटात २९० लोकांचा मृत्यू झाला. तर ५०० हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेनंतर भारतातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना फोन करुन घटनेची माहिती घेतली आणि घडलेली घटनेचा निषेध ही नोंदवला. तसेच या अडचणीच्या प्रसंगी भारत श्रीलंकेस सर्वती मदत करेल असे आश्वासन ही दिली. या घटने नंतर भारतीय तटरक्षक दलाने सागरी सीमावरील बंदोबस्त वाढवला असून अधिक दक्षता घेतली जात आहे.