लष्कर आणि रॉ प्रमुख नेपाळमध्ये, अजित डोभाल श्रीलंकेत! रणनीती आहे तरी काय?

Last Updated: Nov 30 2020 12:58PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

गेल्या काही आठवड्यांपासून उच्चपदस्थ अधिकारी नेपाळ (nepal) आणि श्रीलंका (sri lanka) येथे गेले आहेत. सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे ( Manoj Mukund Naravane) भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला आणि रॉचे प्रमुख (RAW chief samant goel) सामंत गोयल यांच्या नेपाळ भेटीनंतर चीनने आपले संरक्षणमंत्री वेई फेंगेही नेपाळ भेट देतील अशी घोषणा केली.भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (ajit doval) हेही त्रिपक्षीय चर्चेसाठी श्रीलंकेला पोहोचले आहेत. चीनने या कामांवर नजर ठेवली आहे आणि असा दावा केला जात आहे की, चीन नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील जवळीकीने भारत आक्रमकता दाखवत आहे.

अधिक वाचा : चीनच्या आण्विक पाणबुड्यांची समुद्रात टेहळणी

चीनच्या ग्लोबल टाईम्सने (india's diplomatic relations with china) भारताच्या आक्रमक पवित्र्यावरून लिहिले आहे की, चिनी संरक्षणमंत्र्यांच्या नेपाळ दौर्‍याची घोषणा झाल्यापासून त्याचा अर्थ काय यावरुन भारतात चर्चा सुरू झाली आहे. चीन आणि नेपाळमधील सैन्य सहकार्य सामान्य असल्याचे वर्णन करताना ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे की, त्यांचे संबंध चर्चेत ठेवले जात आहेत. वृत्तपत्राने विस्तारवादाचे आरोप फेटाळून लावत भारत लहान देशांना धमकावत असल्याचा आरोप केला आहे. 

चीन-नेपाळ संबंधांमुळे भारताची समस्या

भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे तीन दिवसांच्या दौर्‍यावर नेपाळला गेले. नेपाळकडून दबाव कमी करण्यासाठी हे दौरे करण्यात आल्याचे चीनचे म्हणणे आहे. चीन-नेपाळ यांच्या संरक्षण सहकार्यात भारताला त्रास होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. कारण नेपाळचे बहुतेक शस्त्रे सौदे भारताशी होते. १९८० नंतर बीजिंगने ही जागा घेतली तेव्हा भारताला राग आला.

अधिक वाचा : 'योगी तुमचं नाव बदलेल, पिढ्या नष्ट होतील, पण हैदराबादचे नाव बदलणार नाही, ठेका घेतला आहे का'?

चीन आणि नेपाळसाठी लष्करी सहकार्यातील विकास महत्त्वाचा असल्याचे वृत्तपत्रात म्हटले आहे. नेपाळच्या भौगोलिक स्थानामुळे तिबेटहून तेथे स्थायिक झालेल्या फुटीरतावाद्यांपासून चिनी सीमा वाचविता येतील. याद्वारे, तिबेट स्वायत्त प्रदेशात स्थिरता आणली जाऊ शकते. त्याचबरोबर चीनबरोबर लष्करी सहकार्य केल्याने नेपाळमध्येही स्थिरता टिकू शकते.

लष्कराच्या मुद्द्यांकरिता आणि दक्षिणेकडील भागांसाठी नेपाळने भारताचा आश्रय घेतल्याचा आरोप वृत्तपत्राने केला आहे. नेपाळमधील सैनिक भारतात प्रशिक्षण घेतात आणि नेपाळच्या देशांतर्गत प्रश्नांमध्येही भारत हस्तक्षेप करत आहे. हे सर्व घटक नेपाळच्या राष्ट्रीय स्थिरतेसाठी अनुकूल नव्हते, असा चीनचा आरोप आहे. हर्षवर्धन श्रृंगला आणि नरवणे यांच्या भेटीनेही चीनचा पारा चढला आहे. 

अधिक वाचा : पंतप्रधानांच्या ताफ्यात तैनात होणार ड्रोन्स!

दुसरीकडे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या श्रीलंका दौर्‍यावर आक्षेप घेतला आहे. श्रीलंकेबरोबर चीनच्या सहकार्याने भारत त्रस्त आहे आणि श्रीलंकेला भारत थांबवू इच्छित असल्याचे वृत्तपत्रात म्हटले आहे. दक्षिण आशियातील आपले स्थान बळकट करण्यासाठी भारताला चीनची बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) थांबवायची होता, असा आरोप या वर्तमानपत्राने केला आहे.