Fri, Sep 25, 2020 12:41होमपेज › National › गेहलोत यांच्या विश्वासातील नेत्यांच्या ठिकाणांवर आयकरचे छापासत्र 

गेहलोत यांच्या विश्वासातील नेत्यांच्या ठिकाणांवर आयकरचे छापासत्र 

Last Updated: Jul 13 2020 11:28AM
जयपूर : पुढारी ऑनलाईन

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या राजकीय घडामोडीतच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळच्या काही काँग्रेस नेत्यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. दिल्ली आणि राजस्थानमधील अनेक ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

वाचा : भाजप प्रवेशावर सचिन पायलट यांचं स्पष्टीकरण 

मुख्यमंत्री गेहलोत यांच्या जवळचे धमेंद्र राठोड आणि राजीव अरोरा यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. यातील राजीव अरोरा हे ज्वेलरी फर्मचे माल मालक आहेत. दोन्ही नेते गेहलोत यांच्या अगदी जवळचे मानले जातात.

मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री पायलट यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, भाजपला राजस्थानमधील गेहलोत यांचे सरकार पाडण्यास यश मिळणार नाही, असा टोला काँग्रेस आमदार महेंद्र चौधरी यांनी लगावला आहे. काँग्रेसचे सर्व आमदार आणि युतीतील आमदारांचा मुख्यमंत्री गेहलोत यांना पाठिंबा आहे. सर्व काँग्रेसच्या विधीमंडळीय बैठकीत सहभागी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

वाचा : राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात; सचिन पायलट 'नॉट रिचेबल'

 २०१८ मध्ये गहलोत सरकार स्थापन झाल्यापासूनच गेहलोत आणि पायलटमधील संघर्ष लपून राहिलेला नाही. तर आता हा संघर्ष आरपारच्या लढाईवर आला आहे.
 

 "