Wed, Sep 23, 2020 02:11होमपेज › National › केवळ बायकोसाठी बनवली हटके गाडी; पाहणाऱ्यांनी सुद्धा केला ग्रँड सॅल्युट!

केवळ बायकोसाठी बनवली हटके गाडी; पाहणाऱ्यांनी सुद्धा केला ग्रँड सॅल्युट!

Last Updated: Jul 05 2020 8:21PM
नवी दिल्ली  : पुढारी ऑनलाईन 

काहीवेळा असे होते की पर्यायच कोणता राहत नाही. खासकरुन स्त्रियांसाठी जर बाईक आवडत असली, तरी ऑफ रोड बाईक कमीच आहेत. महिलांना सुद्धा ऑफरोड बाईक चालवण्याचे साहस करायचे असते. त्यामुळे एका नवऱ्याने आपल्या पत्नीसाठी ऑफरोड बाईक बनवली आहे. त्या बाईकचे तुम्हीही फॅन व्हाल. त्या बाईकने अनेक लोकांची मने जिंकली आहेत. लोकांना त्या बाईकचे डिझाईन आवडले आहे. 

वाचा : उत्तर प्रदेश : अवैध कारखान्याला लागलेल्या आगीत ७ मृत्यूमुखी

कॅम्ब्री आणि झॅच नेलसनने एक वर्षाअगोदर एका इनोवेटिव्ह आयडियावर काम सुरु केले होते. त्यांनी दोन इलेक्ट्रिक बाईक्सना जोडले. सेंटरला एक मोठी सीट बनवली, कारण सोप्या पध्दतीने त्यावरती कोणीही बसू शकेल. 

या बाईकचे नाव नॉट व्हिलचेअर असे ठेवले. ही बाईक ऑफ रोड, बर्फ, आणि डोंगर भागात सहज प्रवास करु शकतो. याने प्रवास आरामदायीपणे करु शकतो. विना थकता मोठा प्रवास करु शकतो.अमेरिकेत २७ लाखापेक्षा जास्त व्हिलचेअरचा वापर करतात.  या उत्पादनाची मागणीही वाढत आहे. याचा अर्थ असा की अपंग लोक या दुचाकीद्वारे ऑफ-रोडचा आनंद घेऊ शकतात. या उत्पादनाची मागणीही वाढत आहे. अपंग लोक या दुचाकीद्वारे ऑफ-रोडचा आनंद घेऊ शकतात.

पाठीमागे एक व्यक्ती उभा राहू शकतो. सामानही ठेवता येते. टेंटही आपल्याबरोबर घेऊ शकतो. ही बाईक पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. त्याची किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये आहे.

वाचा :कोरोना महामारीमुळे केरळने घेतला सर्वांत मोठा निर्णय!

 "