Tue, Aug 11, 2020 21:49होमपेज › National › धक्कादायक! पतीने कॉलगर्लला बोलावले अन् आली पत्नी

पतीने कॉलगर्लला बोलावले अन् आली पत्नी

Last Updated: Jan 22 2020 2:20AM

संग्रहित फाेटाेउत्तराखंड : पुढारी ऑनलाईन

एका व्यक्तीने व्हॉट्सॲप नंबरवरुन कॉल गर्लला फोन केला. कॉल गर्ल म्हणून त्याची पत्नीच आली. या दोघांमध्ये जोरदार मारामारी झाली. त्यांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना उत्तराखंडच्या काशीपूर येथील आहे. हे प्रकरण स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.

वाचा :बाप रे! ८ वीच्या विद्यार्थ्यावर वर्गशिक्षिकेचं जडलं प्रेम 

या दोघांचे वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र, त्यांच्यात सारखी सारखी भांडण होत होती. या भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी जावून राहिली. ती आपल्या आई वडीलांसोबत काशीपूर येथे राहत होती. या महिलेचे तिच्याच एका मैत्रिणीसोबत भांडण झाले. या मैत्रिणीने तिच्या पतीस तुझी पत्नी कॉल गर्ल म्हणून काम करते म्हणून सांगितले. संबंधित महिलेने तक्रार करण्याबरोबरच एका महिलेचा क्रमांक या व्यक्तीला दिला. “ही माहिला कॉलगर्ल पुरवते. तुम्हीच फोन करुन खात्री करुन घ्या,” असंही या महिलेने सांगितले.

वाचा : आईला सोबत घेऊन हनीमूनला गेली पतीचा सासूवर जडला जीव 

त्या महिलेने दिलेल्या क्रमांकावर पतीने कॉल केला व चौकशी केली. त्याला काही वेळानंतर व्हाट्सॲपवर महिलांचे फोटो आले. या फोटोमध्ये त्याने त्याच्या पत्नीचाच फोटो निवडला व पत्ता पाठवला. त्या महिलेने दिलेल्या क्रमांकावर पतीने कॉल केला व चौकशी केली. त्याला काही वेळानंतर व्हाट्सॲपवर महिलांचे फोटो आले. या फोटोमध्ये त्याने त्याच्या पत्नीचाच फोटो निवडला व पत्ता पाठवला. या पत्त्यावरब ठरलेल्या वेळेत ती महिला आली. त्याच्या पत्नीचा चेहरा पाहून त्याला राग आला. या नवरा बायकोंमध्ये जोराचा वाद झाला. तसेच दोघांमध्ये जोरदार मारामारी झाली. हे प्रकरण पोलिसांत गेले. दोघांनाही एकमेकांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली. आपली पत्नी कॉलगर्ल म्हणून काम करते असे पतीने तक्रारीत म्हटले आहे. तर, दुसरीकडे पत्नीने आपल्या पतीचे मैत्रिणीबरोबर संबंध असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे.

वाचा : मुला-मुलीच्या लग्नात जुळलं जुन्या प्रेमाचं सूत, दोघे गेले पळून!