Wed, Sep 23, 2020 01:39होमपेज › National › देशात दिवसात उच्चांकी 507 मृत्युमुखी

देशात दिवसात उच्चांकी 507 मृत्युमुखी

Last Updated: Jul 02 2020 12:36AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका दिवसात उच्चांकी 500 हून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या त्यामुळे साडेसतरा हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचा वेग थोडाफार मंदावल्याचे दिसून आले आहे, हे विशेष.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपर्यंत देशात 18 हजार 653 कोरोनाबाधितांची भर पडली. तर उच्चांकी 507 रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या एका दिवसात 13 हजार 157 रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली असून, त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 5 लाख 85 हजार 493 झाली आहे. यातील 3 लाख 47 हजार 979 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 20 हजार 114 रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 17 हजार 400 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

 "