Sun, Sep 20, 2020 05:45होमपेज › National › वडापाव नव्हे तर इथं मिळतो आईस्क्रिम पाव

वडापाव नव्हे तर इथं मिळतो आईस्क्रिम पाव

Last Updated: Sep 17 2020 12:51PM
अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन

बहुतांश खवय्यांचा वडा पाव हा सर्वात आवडता पदार्थ आहे. पावासोबत अन्य पदार्थाची खवय्यांनी चव चाखली आहे. म्हणजेच, समोसा पाव, भाजी पाव, इडली पाव, मस्का पाव, पाव भाजी असे अनेक चविष्ट पदार्थ. पण कधी पावासोबत आईस्क्रिमची चव कधी चाखली आहे का? असा सवाल विचारल्यावर तुम्ही बुचकळ्यात पडाल. पण हो, गुजरातमध्ये आईस्क्रिम पाव हा पदार्थ मिळतो. सध्या या पदार्थाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

आईस्क्रिम पाव; कसा तयार करतात?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बर्फच्या गोळ्यावर ज्या फ्लेवर्सचा वापर करतात ते सर्व फ्लेवर्स पावात टाकतो. त्यानंतर फ्रिजमधील आईस्क्रिमचा गोळा घेऊन तो त्या पावात ठेवतो. पुन्हा त्यावर फ्लेवर्स वापर करतो. आणि सर्वांना खायला देतो. 

 हा व्हिडिओ साहिल अधिकारी या एका ट्विटर युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही हटके रेसिपी पाहून युजर्सकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ही रेसिपी काहींच्या पसंतीस उतरली आहे तर काहींनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. 

वडा पावचा इतिहास

वडा पाव हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. दादर स्टेशनजवळच्या एका चाळीमध्ये राहणाऱ्या अशोक वैद्य यांनी आपले वडे आणि पोहे विकण्याचे दुकान १९६०च्या दरम्यान सुरु केले. आसपासच्या दुकानातही असेच काही खाण्याचे पदार्थ मिळत होते. 

१९६६ च्या दरम्यान अशोक वैद्य यांना एक आयडिया सुचली. ही आयडिया एकदम साधी सोप्पी होती. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून त्यांनी ते तेलात तळले आणि  बटाटावडा हा पदार्थ तयार झाला.  

एका पाव आणि त्याच्या मध्यभागी बटाट्यापासून तयार केलेल्या वड्याला ठेवायचं, एवढंच !! इथूनच म्हणजेच, मुंबईत वडापावचा जन्म झाला जो पुढची अनेक वर्ष मुंबईकरांच्या आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या जिभेवर अद्यापही रेंगाळत आहे. 

 "