अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन
गुजरातमधील सहा महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. या सहा पालिकांवर भाजपचे वर्चस्व असेल, असे मतमोजणीवरून स्पष्ट होत आहे. अहमदाबादसह, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोट महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले होते. आज मतमोजणी सुरू आहे. सहा महापालिकांच्या २ हजार २७५ उमेदवारांच्या भविष्याचा आज फैसला होणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीत आम आदमी पक्षाने खाते उघडले आहे. सूरतमधील ८ जागांवर आपने विजय मिळवला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये सहाही महापालिकांत भाजपने आघाडी घेतल्याचे दिसते.
- अहमदाबादमध्ये काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळवला.