कोरोनाबाधितांचा वाढता आलेख कायम!

Last Updated: Jul 14 2020 1:49AM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख सातत्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या आठवडाभरापासून कमालीची वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सक्रिय रुग्णांची संख्या आता तीन लाखांहून अधिक झाली आहे. कोरोना बळींची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात तब्बल 22 लाख 66 हजारांहून अधिक नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून, 2 लाख 29 हजार 939 कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपर्यंत तब्बल 28 हजार 701 नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली. 500 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत मात्र सौम्य घट नोंदवण्यात आली आहे. रविवारी 18 हजार 850 कोरोनामुक्त रुग्णांना विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे 8 लाख 78 हजार 254 झाली आहे. यातील 5 लाख 53 हजार 471 रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे, तर 3 लाख 1 हजार 609 रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 23 हजार 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सक्रिय रुग्णसंख्येत 9 हजार 351 ची वाढ नोंदवण्यात आली. देशातील कोरोनामुक्तीचा दर 63.02 टक्के नोंदवण्यात आला आहे.

सर्वाधिक कोरोना प्रभावित महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात 7 हजार 827 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू (4,244), कर्नाटक (2,627), आंध्र प्रदेश (1,933), दिल्ली (1,573), पश्चिम बंगाल (1,560) तसेच बिहारमध्ये (1,269) सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले. या राज्यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेश (1,384), तेलंगणा (1,269), हरियाणा (658), केरळमध्ये (435) कोरोनाग्रस्तांची लक्षणीय भर दिसून आली. गेल्या एका दिवसात महाराष्ट्रात सर्वाधिक 173 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. कर्नाटक (71), तामिळनाडू (68), दिल्ली (37), पश्चिम बंगाल (26), उत्तर प्रदेश (21), गुजरात (13), जम्मू-काश्मीर (10), मध्य प्रदेशात (9) कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ दिसून आली. रविवारी दिवसभरात केवळ 2 लाख 19 हजार 103 नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशातील 1 कोटी 18 लाख 6 हजार 256 नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) देण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांचा पायगुणच असा आहे की जाईल तिथे त्यांचा कार्यक्रम होतो : सतेज पाटील


ढगाळ हवामान, गार वारा वाहतोय! जाणून घ्या हवामानातील हा बदल कशामुळे? (व्हिडिओ)


जळगाव : चाळीसगावात गोळीबार; एकजण जखमी


राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे ज्‍येष्‍ठ स्‍वयंसेवक सुरेंद्र थत्ते यांचे निधन


कोल्हापूरनंतर पालघरमध्येही आदिवासी महिलेची वाटेतच झाली प्रसूती, बालकाचा मृत्यू, मातेची मृत्यूशी झुंज 


साखर कामगारांचा राज्यव्यापी संप मागे 


ठाणे : धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग, खाली फेकण्याचा प्रयत्न, दोघांना अटक 


दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप


हिमांशी खुराना जेव्हा पार्टीत रडते तेव्हा...(video) 


अर्थव्यवस्था संकटातून सावरतेय; तांत्रिक मंदीला काहीही अर्थ नाही : नीती आयोग