Fri, Sep 18, 2020 18:47होमपेज › National › मुलामुलीच्या लग्नात जुळलं जुन्या प्रेमाचं सूत, दोघे गेले पळून!

मुला-मुलीच्या लग्नात जुळलं जुन्या प्रेमाचं सूत, दोघे गेले पळून!

Last Updated: Jan 21 2020 6:57PM

संग्रहित छायाचित्रसुरत : पुढारी ऑनलाईन 

कुणाला कधी कुणावर प्रेम होईल, सांगता येत नाही. अनेकजण बिनधास्त प्रेम करून आपल्या प्रेमाचा अध्याय लिहितात; सर्व बंधने, नियम तोडून बोहल्यावर चढतात. सुरतमध्ये असंच काहीसं घडलं आहे. या घडलेल्या घटनेबाबत वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसेल. आपल्या मुला-मुलीचे लग्न होण्याआधीच नवऱ्या मुलाचा बाप आणि नवरी मुलीची आई वऱ्हाडातून पळून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

सूरत शहरामध्येच राहणाऱ्या एका तरुण आणि तरुणीचा लग्नसोहळा होता. मात्र, लग्न होण्यापूर्वीच कटारगम येथील ४८ वर्षीय नवऱ्या मुलाचे वडील आणि नवसारी येथील नवरी मुलीची ४६ वर्षीय आई दोघे घरातून पळून गेले. याची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांना धक्काच बसला. मागील १० दिवसांपासून दोघेही बेपत्ता आहेत. हे दोघेही एकमेकांबरोबर पळून गेल्याची शक्यता दोन्ही कुटुंबांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबांना तोंड दाखवायची सोय उरली नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रारदेखील पोलिसांत दाखल केली आहे.

वाचा - अश्लिल चाळे करणाऱ्या तीन जोडप्यांना पकडले

वर्षभरापूर्वी तरुण आणि तरुणीचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. लग्न अगदी एका महिन्यावर आले असताना मुलाचे वडील आणि मुलीची आई एकमेकांबरोबर पळून गेले आहे. 

कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात होते दोघे

नवरदेवाचे वडील हे कापडाचे व्यापारी आहेत. ते १० जानेवारीपासून घरातून निघून गेले आहेत. राकेश हे नवरीचे आई रेश्मा यांना लहानपणापासूनच ओळखत होते. लहानपणी ते दोघे एकमेकांचे शेजारी होते. कटारगम येथे त्यांची कुटुंबे शेजारी-शेजारी राहायची. कॉलेजमध्ये दोघे एकमेकांच्या प्रेमात होते, असे त्यांच्या काही मित्रांनी सांगितलं. त्यानंतर दोघांच्या कुटुंबांना त्यांच्या नात्याबद्दल समजलं. आता लग्न ठरलेल्या तरूण-तरूणीचे लग्न मोडल्यात जमा आहे. 

 "