Fri, Oct 30, 2020 08:01होमपेज › National › ट्रम्प भारतात जेवणार सोन्याच्या ताटात तर चहा पिणार चांदीच्या कपात

ट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात!

Last Updated: Feb 23 2020 11:08AM
जयपूर : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसासाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारतात जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या जेवणासाठी भारताने विशेष तयारी केली आहे. भारत दौऱ्यादरम्यान ट्रम्प कुटुंबिय सोन्याच्या ताटात जेवणाचा अस्वाद घेणार आहेत. तर, त्यांच्या चहापानासाठी चांदीच्या कपाची सोय करण्यात आली आहे. 

जयपूरचे प्रसिद्ध डिझायनर अरुण पाबूवाल यांनी ट्रम्प कुटुंबियांच्या वापरासाठी खास कटलरी व टेबल वेअर डिझाईन तयार केले आहे. खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी तयार केली आहे. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला दिल्ली प्रवासादरम्यान याच सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या थाळीत जेवण वाढले जाणार आहे. इतकेच नव्हे तर गोल्ड प्लेटेड नॅपकिन सेटही तयार करण्यात आला आहे.

डिझाइन केलेल्या या खास गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये ट्रम्प आणि त्यांचे कुटुंब ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करणार आहे अशी माहिती पाबुवाल यांनी दिली. या क्रॉकरीमध्ये कपसेटपासून ड्रायफ्रूट ठेवण्याची कटलरी सुद्धा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला खास नॅपकिन सेटही बनवण्यात आला आहे. त्यावर ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.

३५ जणांच्या टीमने तीन आठवडयांमध्ये सोन्या-चांदीची ही क्रॉकरी बनवली आहे. वेगवेगळया धातूंचा समावेश केलेल्या या थाळयांना सोन्या-चांदीचा मुलामा देण्यात आला आहे.

भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह दोन राष्ट्राध्यक्षांसाठी टेबलवेअर डिझाईन तयार केलेले आहे. याशिवाय मेटल डिझायनर पाबूवाल यांनी क्रिकेट वर्ल्ड कपपासून विश्वस्तरीय सौंदर्य स्पर्धांसाठीही ट्रॉफी व मुकुट तयार केलेले आहेत.

 "