Tue, Jun 15, 2021 12:16
कोरोनाशी लढा, पंतप्रधानांशी नव्हे! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी 'मन की बात' टिप्पणीवरुन मुख्यमंत्र्यांना खडसावले

Last Updated: May 07 2021 6:08PM

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ट्विटवर शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दूरध्वनीवरील संभाषणात फक्त 'मन की बात' झाल्याचा आरोप केला. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीविरूद्ध नव्हे तर कोरोनाविरूद्धच्या लढण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे ट्विट केले. 

अधिक वाचा : ‘पंतप्रधानांनी काम की बात केली असती तर बरे झाले असते’: ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट केले की, हेमंत सोरेन जी, कदाचित आपण पदाचा मान विसरला असाल. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल देशाच्या पंतप्रधानांवर विधान करतांना त्यांनी हे विसरू नये की या साथीचा अंत केवळ सामूहिक प्रयत्नातूनच शक्य आहे. आपले अपयश लपवण्यासाठी आपल्या मनातील संताप पंतप्रधानांवर व्यक्त करणे लाजिरवाणे आहे.

अधिक वाचा : महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा!

ते पुढे म्हणाले, कोरोना संकटात केंद्र सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी खजिना उघडला आहे. झारखंड सरकारने आपली तिजोरी बंद ठेवली आहे. हेमंत सोरेन यांची केंद्र सरकारने सर्व काही करावे अशी इच्छा आहे. कोरोनाशी लढा, पंतप्रधानांशी नव्हे!

अधिक वाचा : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा अन् एम्सने केला तातडीने खुलासा!

गुरुवारी रात्री पंतप्रधान मोदींनी हेमंत सोरेन यांच्याशी राज्यातील कोविड परिस्थितीबद्दल चर्चा केली. संभाषणानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट केले की पंतप्रधान मोदींनी संभाषणादरम्यान फक्त "मन की बात" केली. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर ऐकले असते आणि बोलले असते तर बरे झाले असते.

अधिक वाचा : तुम्ही आत्तापर्यंत ऑक्सिजन आणि इतर सुविधांसाठी पथके का पाठवली नाहीत? सीएम ममता भडकल्या