Fri, Oct 30, 2020 18:36होमपेज › National › #FarmBills : शेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'

#FarmBills : शेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'

Last Updated: Sep 25 2020 9:20AM

पंजाब- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमृतसर शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या कृषी विधेयकांविरोधात देशातील शेतकरी संघटनांनी आज, शुक्रवारी भारत बंदची हाक दिली आहे. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध शेतकरी संघटना या बंदमध्ये सहभागी होत आहेत. 

वाचा : कृषी विधेयक रद्द करण्यासाठी अंतीम क्षणापर्यंत लढणार

कृषी विधेयकांना सर्वाधिक विरोध हरियाणा आणि पंजाबमधून होत आहे. शेतकरी संघटनांसोबत काही राजकीय पक्ष देखील कृषी विधेयकांविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शेतकरी रस्त्यांवर उतरुन चक्काजाम आणि रेल्वे मार्गावर निदर्शने करणार आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब- हरियाणातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

वाचा : कृषी विधेयकांची शेतकऱ्यांना कमी तर काँग्रेसला जास्त चिंता; कृषिमंत्री तोमर यांचा हल्लाबोल

पंजाबमध्ये शेतकऱ्यांना काल गुरुवारी रेल रोको आंदोलन केले. आज ते राज्यातील विविध भागात रेल्वे मार्गावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात किसान मजदूर समिती आणि भारतीय किसान युनियनशी संबंधित शेतकरी सहभागी झाले आहेत. हरियाणात सर्व महामार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाचा : कृषी विधेयकं फसवी; आंदोलन करणार : राजू शेट्टी (video)

पंजाबमध्ये आज ३१ शेतकरी संघटनांनी पंजाब बंदची हाक दिली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.   

 "