Tue, Aug 04, 2020 13:55होमपेज › National › गुजरातसह आसाम, भूकंपाने हादरले

गुजरातसह आसाम, भूकंपाने हादरले

Last Updated: Jul 16 2020 9:45AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज भूकंपाचे धक्के बसले. गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. राजकोट आणि सौराष्ट्रच्या काही परिसरात ४.८ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंद करण्यात आली. जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. 

सौराष्ट्रच्या आधी कच्छ परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. गेल्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुजरातशिवाय दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीरमध्येही भूकंप झाला. 

हिमाचल प्रदेशातील उनामध्ये आज सकाळी ४ वाजून ४७ मिनिटांनी २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला तर आसाममधील करीमगंजमध्ये आज सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.