Sun, Jan 17, 2021 05:43
हरियाणात सरकार वाचवण्यासाठी भाजपची पळापळ; दुष्यंत चौटाला पीएम मोदींशी चर्चा करणार! 

Last Updated: Jan 13 2021 2:55PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ (farmer protests) गेल्या सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत आंदोलनावर चर्चा होणार आहे. मंगळवारी चौटाला यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घतली होती. (Dushyant Chautala met with Prime Minister Narendra Modi)

अधिक वाचा : शंभरीकडे दमदार वाटचाल सुरु! पेट्रोल, डिझेल दरात पुन्हा वाढ⛽

चौटाला जननायक जनता पार्टी (जेजेपी) चा नेते आहेत. जे हरियाणामधील भाजप सरकारमधील घटक पक्ष आहे. असे मानले जाते की जेजेपीच्या काही आमदारांवर आंदोलक शेतकऱ्यांचा दबाव आहे. जेजेपीने निवेदनात म्हटले आहे की, चौटाला बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.

अधिक वाचा : अंगणवाडी सेवा सुरु करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सरकारला धोका नाही

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि चौटाला यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीनंतर खट्टर आणि चौटाला म्हणाले होते की भाजप-जेजेपी युती सरकारला कोणताही धोका नाही आणि हे सरकार पाच वर्षा मुदत पूर्ण करेल. ते म्हणाले होते की त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी चर्चा केली. मंगळवारी अमित शहांच्या भेटीनंतर खट्टर म्हणाले की, राज्यातील राजकीय परिस्थिती ठीक आहे. विरोधी पक्ष आणि माध्यमांचे अनुमान निराधार आहे. आमचे सरकार (भाजप-जेजेपी युती) सक्षमपणे वाटचाल करत आहे आणि पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल.

अधिक वाचा : पंतप्रधान फसल बिमा योजनेला पाच वर्ष पूर्ण

जेजेपीच्या आमदारांनी इशारा दिला

यापूर्वी जेजेपीच्या आमदारांच्या गटाने म्हटले आहे की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे न घेतल्यास राज्यातील युती सरकारला मोठी किंमत मोजावी लागू शकते. जेजेपीचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यापूर्वी काही तास आधी आमदारांनी हा दावा केला होता. हरियाणा, पंजाब आणि देशातील शेतकरी या कायद्यांच्या विरोधात असल्याने केंद्राने हे कायदे मागे घ्यावेत, असे जेजेपीचे आमदार जोगी राम सिहाग म्हणाले. ते म्हणाले की आम्ही दुष्यंत यांना अमित शहांकडे आमच्या भावनांबद्दल माहिती देण्यास उद्युक्त करू. Dushyant Chautala met with Prime Minister Narendra Modi)