Fri, Sep 18, 2020 12:58होमपेज › National › कोरोनाविरुद्ध दुहेरी फायदा देणारी लस अंतिम टप्प्यात

कोरोनाविरुद्ध दुहेरी फायदा देणारी लस अंतिम टप्प्यात

Last Updated: Aug 06 2020 1:20AM
नवी दिल्ली :

कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी आणखी एक लस चाचणीत यशस्वी ठरत असल्याचा दावा नोवावॅक्स या अमेरिकन कंपनीने केला आहे. ही लस कोरोना व्हायरसला नष्ट तर करेलच, शिवाय रोगप्रतिकार शक्तीही वाढविण्यास उपयुक्त ठरेल, असे कंपनीने म्हटले आहे. 

आमच्या कोरोना लसीची शेवटच्या टप्प्यातील तिसरी चाचणी सप्टेंबरच्या अखेरीस संपेल. यानंतर आम्ही पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये 100 कोटी ते 200 कोटी लसीचे उत्पादन करण्यास सक्षम असू, असे नोवावॅक्सने स्पष्ट केले आहे. नोवावॅक्सचे प्रमुख ग्रेगरी ग्लेन यांनी म्हटले आहे, की मला विश्वास आहे की, शेवटच्या टप्प्यातील डेटामुळे आम्हाला सरकारकडून औषध बनवण्याची परवानगी मिळेल. ही परवानगी आम्हाला या वर्षी डिसेंबरच्या सुरूवातीला मिळण्याची आशा आहे.

नोवावॅक्सच्या एनव्हीएक्स-कोव्ह 2373 लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोविड-19 रूग्ण पूर्णपणा बरा होत असल्याचे कंपनीच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या लसनिर्मितीला अमेरिकेने अर्थसहाय्य पुरविले आहे.  या लसीमुळे आतापर्यंत 18 ते 59 वर्षांच्या 106 कोविड-19 रूग्णांना बरे केले असल्याचे पहिल्या टप्प्यातील अभ्यासावरून समोर आल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

 "