Sat, Oct 24, 2020 23:02होमपेज › National › देशात कोरोनाग्रस्त आढळण्याचा वेग मंदावला

देशात कोरोनाग्रस्त आढळण्याचा वेग मंदावला

Last Updated: Sep 22 2020 10:53AM

संग्रहीत छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशात कोरोनाग्रस्त आढळण्याचा वेग जरा मंदावला असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चार दिवसांपासून सातत्याने ९० हजारांहून अधिक कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. पहिल्यांदाच एकूण सक्रिय रुग्णसंख्येत त्यामुळे कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. भारतात कोरोना संसर्ग सुरु झाला तेव्हापासून आतापर्यंतचा कोरोनामुक्तांचा उच्चांकी संख्या सोमवारी बघायला मिळाली. गेल्या एका दिवसात तब्बल १ लाख १ हजार ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या त्यामुळे ४४ लाख ९७ हजार ८६७ एवढी झाली आहे. भारताचा कोरोनामुक्तीचा दर मंगळवारी ८०.८१% नोंदवण्यात आली. गेल्या एका दिवसात सक्रिय रुग्णसंख्येत २७ हजार ४३८ ने घट नोंदवण्यात आली आहे.

वाचा : 'खासदारांच्या गैरवर्तनामुळे रात्रभर झोपू शकलो नाही, एक दिवस उपोषण करणार'

मंगळवारी सकाळपर्यंत देशात ७५ हजार ८३ नवीन रुग्णांची भर पडली. तर,१ हजार ५३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची आकडा त्यामुळे ५५ लाख ६५ हजार ६६३ एवढा झाला आहे. यातील ९ लाख ७५ हजार ८६१ (१७.५४%) ​सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, देशातील ८८ हजार ९३५ रुग्णांचा (१.६०%) कोरोनामुळे दुदैवी मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नूसार सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट नोंदवण्यात आली. महाराष्ट्रात सोमवारी १५ हजार ७३८ नवीन कोरोनाग्रस्त आढळले. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक (७,३३९), आंधप्रदेश (६,२३५), तामिळनाडू (५,३४४), उत्तर प्रदेश (४,६१८), ओडिशा (४,२४२) तसेच पश्चिम बंगालमध्ये (३,१६५) कोरोनाग्रस्त आढळून आले. सोमवारी दिवसभरात ९ लाख ३३ हजार १८५ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत ६ कोटी ५३ लाख २५ हजार ७७९ कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

वाचा :केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास; आज मी दिवसभर उपोषण करणार : शरद पवार 

गत चार दिवसातील कोरोनास्थिती 

  दिनांक        कोरोनामुक्त   कोरोनारुग्ण
१) १९ सप्टेंबर    ९५,८८०         ९३,३३७
२) २० सप्टेंबर    ९४,६१२         ९२,६०५
३) २१ सप्टेंबर     ९३,३५६        ८६,९६१ 
४) २२ सप्टेंबर    १,०१,४६८      ७५,०८३ 

सर्वा​धिक कोरोनाप्रभावित राज्यातील स्थिती 

वाचा : 'विरोधकांकडून उपसभापती हरिवंश यांची हत्या झाली असती'

 राज्य     सक्रिय रुग्ण   कोरोनामुक्त    मृत्यू 
१)महाराष्ट्र    २,७५,०१७    ९,१६,३४८    ३३,०१५
२) कर्नाटक    ९५,३५४      ४,२३,३७७    ८,८७१
३) आंधप्रदेश   ७४,५१८     ५,५१,८२१     ५,४१०
४) उत्तरप्रदेश  ६४,१६४      २,८९,५९४     ५,१३५
५)तामिळनाडू  ४६,४९५      ४,९१,९७१      ८,८७१
६)ओडिशा      ३४,०३३       १,४९,३७९         ७१०

७९% कोरोनामुक्त १० राज्य, केंद्रशासित प्रदेशातील 

सोमवारी देशात उच्चांकी १ लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. एकूण कोरोनामुक्तांपैकी ७९ टक्के कोरोनमुक्त हे १० राज्य, केंद्रशासित प्रदेशातील होते. त्यात महाराष्ट्रातील ३२,००७ (३१.५%), आंधप्रदेश १०,५०२ (१०.४%), कर्नाटक ९,९२५ (९.८%), उत्तरप्रदेश ६,३२० (६.२%) तसेच तामिळनाडू ५,४९२ (५.४%) या राज्यांचा समावेश आहे.

वाचा : जेव्हा उपसभापती निलंबित खासदारांसाठी चहा आणतात....

 "