Thu, Jun 24, 2021 10:42
दिल्लीतील कोरोना परिस्थिती हाताबाहेर, मोठी मैदाने, मंदिर परिसर, रिकाम्या जागांवर कोव्हिड उपचार केंद्रे!

Last Updated: Apr 19 2021 10:04AM

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशाची राजधानी दिल्लीतील कोरोनाचे संकट गंभीर होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर मोठी मैदाने, मंदिर परिसर तसेच रिकाम्या जागांवर कोव्हिड उपचार केंद्रांची स्थापना करण्याचे काम दिल्ली सरकारने वेगाने चालू केले आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची दैनिक संख्या आता 25 हजारांच्या पुढे गेली आहे. 

वाचा : ...अन् भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागेल; शिवसेनेचा टोला

रुग्णवाढीच्या प्रचंड वेगामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कोरोना संकट कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने विविध प्रकारचे प्रतिबंध घातले असले तरी त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीबरोबरच शेजारी राज्यातील रूग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने रुग्णांचे हाल सुरु आहेत. 

केजरीवाल सरकारने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 18 हजार 130 बेड्स आहेत. यातील 15 हजार 104 बेड्स भरले असून 3 हजार 26 बेड रिकामे आहेत. अतिदक्षता अर्थात आईसीयू बेड्सचा विचार केला तर एकूण 4206 मधील 4105 बेड्स भरले आहेत. केवळ 101 आईसीयू बेड्स रिकामे आहेत. वाढते संकट विचारात घेता 7 हजार बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले जावेत, अशी मागणी केजरीवाल सरकारने केंद्राकडे केली आहे.

वाचा : मंडईत आले अन् कोव्हिड सेंटरमध्ये दाखल झाले!